India Tour Of Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने भारतीय क्रिकेटमधील एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. भारताचा कायमस्वरूपी टी-२० कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा हा पहिलाच सामना असेल. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली आहे, जिथे त्याने चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यनंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारताच्या श्रीलंका दौऱ्यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासणार आहे. रियान पराग आणि रिंकू सिंह सारख्या युवा खेळाडूंसाठी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करणे, ही मोठी परीक्षा असणार आहे. दरम्यान, शुभमन गिलला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधारपदी बढती मिळाल्यानंतर तो ही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना २७ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील सोनी स्पोर्ट्स टेन १, सोनी स्पोर्ट्स टेन १ एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन ५ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ५ एचडी टीव्ही चॅनेलवर पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्हवर पाहता येईल.
पहिला टी-२० सामना: शनिवार, २७ जुलै २०२४
दुसरा टी-२० सामना: रविवार, २८ जुलै २०२४
तिसरा टी-२० सामना: मंगळवार, ३० जुलै २०२४
संबंधित बातम्या