SL vs IND Asia Cup : पावसामुळं फायनल रद्द झाल्यास विजेता कोण?, पाहा आशिया कपचे नियम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SL vs IND Asia Cup : पावसामुळं फायनल रद्द झाल्यास विजेता कोण?, पाहा आशिया कपचे नियम

SL vs IND Asia Cup : पावसामुळं फायनल रद्द झाल्यास विजेता कोण?, पाहा आशिया कपचे नियम

Sep 17, 2023 08:59 AM IST

SL vs IND Asia Cup : कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंकेत आशिया कपची फायनल मॅच होणार आहे. परंतु या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.

SL vs IND Asia Cup
SL vs IND Asia Cup (HT)

ind vs sl asia cup 2023 final prediction : पाकिस्तानला चीतपट करून भारत आणि श्रीलंकन संघ आज आशिया कपच्या फायनलमध्ये भिडणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियम आज दुपारी तीन वाजेपासून फायनल सामन्याचा थरार रंगणार आहे. परंतु आशिया कपमधील बहुतेक सामन्यांवर पावसाचं सावट होतं. त्यामुळं काही सामने रद्द करावे लागले, तर काही सामन्यांना राखीव दिवस द्यावा लागला होता. परंतु आज होणारी फायनल मॅचमध्ये पावसाने गोंधळ घातला तर चाहत्यांनी मोठी अडचण होणार आहे. कोलंबोत आजही पावसाची शक्यता आहे. त्यामुळं पावसामुळं सामना रद्द झाला तर विजेता कोण होणार?, याबाबतची माहिती समोर आली आहे.

आशिया कपमधील सुपर ४ पूर्वी आणि नंतर भारत आणि श्रीलंकन संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्यामुळं आशिया कपच्या क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी तर श्रीलंकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु सामना सुरू असताना पाऊस झाला तर प्रत्येकी २० षटकांचा खेळ करून डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता ठरवण्यात येईल. ४० षटकांचाही खेळ न झाल्यास फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

राखीव दिवशी २० षटकांचा खेळ झाला नाही तर सामन्याचा निकाल लागणार नाही. अशा वेळी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येणार आहे. पावसामुळं सामना रद्द झाल्यास दोन्ही संघ विजेते ठरणार आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात पावसाने गोंधळ घालू नये, अशी प्रार्थना दोन्ही संघाचे समर्थक करत असल्याचं दिसून येत आहे.

भारतीय संघाची संभावित प्लेईंग ११-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

श्रीलंकन संघाची संभावित प्लेईंग ११-

दासून शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालेज, महीश तीक्ष्णा, कसुन रजिथा, मथीशा पथिराना

Whats_app_banner