IND vs SL 2nd T20I : पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारताने श्रीलंका संघाचा पराभव करत ३ सामन्याची मालिका खिशात घातली. भारताने दुसरा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेला सात विकेटने धूळ चारत तीन सामन्याची मालिका २-० अशी जिंकली. आता ३० जुलै रोजी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघ केवळ आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी उतरेल.
भारताने २७ जुलै रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यातही श्रीलंका संघाला ४३ धावांनी हरवले होते. आजच्या सामन्यात भारताने टिच्चून गोलंदाजी करत श्रीलंकेला १६१ धावांवर रोखले. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना तीन चेंडूंचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर भारताला ४५ चेंडूत ७२ धावांचे लक्ष्य देण्यात आले, जे भारताने आरामात पार केले.
पावसामुळे षटके कमी करत भारताला ८ षटकात ७८ धावांचे लक्ष्य मिळाले. हे आव्हान भारतीय संघाने ६.३ षटकात व ३ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून यशस्वी जयस्वालने ३० तर कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने नाबाद २२ धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ९ वाद १६१ धावा करून भारतासमोर १६२ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय डावाची सुरुवात होताच पावसाने खेळात व्यत्यय आणला. यजमान श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा कुशल परेरा याने बनवल्या. त्याने ३४ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा ठोकल्या. भारताकडून रवी बिश्नोईने तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. कुशल मेंडिस १० धावांवर तंबूत परतला. त्यानंतर पथुम निसांका ३२ धावा केल्या त्याने परेराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. कामिंदु मेंडिसने २६ धावा केल्या. हार्दिक पांड्याने मेंडिस व परेरा दोघांना १६ व्या षटकात तंबूत धाडले. श्रीलंकेने शेवटच्या ६ विकेट केवळ ३१ धावांत गमावल्या. कर्णधार चरिथ असलंका याने १४ धावांचे योगदान दिले. दासुन शनाका आणि वानिंदु हसरंगा यांना भोपळाही फोडता आला नाही. या विजयाबरोबरच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय टीमने तीन सामन्याच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
संबंधित बातम्या