भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेला आज (२ ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडिया प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत.
भारतीय संघाने प्लेइंग-११ मध्ये ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून समावेश केला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीदरम्यान सांगितले की, श्रेयस अय्यर संघात परतला आहे, तर शिवम दुबेलाही या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
कर्णधार रोहित शर्माने यष्टिरक्षक म्हणून फलंदाज केएल राहुलवर विश्वास व्यक्त केला. हर्षित राणा, रियान पराग आणि खलील अहमद यांनाही संधी मिळाली नाही. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज श्रीलंकेकडून पदार्पण सामना खेळण्यासाठी आला आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालेगे, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.
भारत-श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड बघितला तर, भारतीय संघाचा वरचष्मा आहे, पण श्रीलंकेला अजिबात हलके घेता येणार नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत १६८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
या दरम्यान भारताने ९९ सामने जिंकले, तर श्रीलंकेने ५७ सामन्यात विजय मिळवला. तर ११ सामने अनिर्णित राहिले. याशिवाय एक सामना बरोबरीत राहिला.
एकूण सामने: १६८
भारत जिंकला: ९९
श्रीलंका जिंकली: ५७
अनिर्णित: ११
टाय: १
संबंधित बातम्या