भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (८ नोव्हेंबर) डरबन येथे खेळला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल. पण त्याआधी चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
वास्तविक, डरबनमध्ये आज हवामान अतिशय खराब असणार आहे. अशा स्थितीत सामन्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही कर्णधारांच्या नजरा आधी गोलंदाजी घेण्यावर असतील जेणेकरून सामन्यात डीएलएसचा वापर झाला तर त्यांना लक्ष्याची कल्पना येईल.
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. सूर्यकुमार यादवच्या यंगिस्तानसाठी आफ्रिकेच्या भूमीवर ही खरी कसोटी असणार आहे.
डरबनमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सर्वात संथ खेळपट्टी आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की ती पीच भारतीय खेळपट्ट्यांसारखी असेल. येथे फलंदाजांची कसोटी असणार आहे. प्रथम फलंदाजी करताना या मैदानाची सरासरी धावसंख्या १३६ आहे.
डरबन येथे आज वाऱ्याचा वेग साधारणतः प्रति तास १३ किलोमीटर असेल, परंतु काहीवेळा तो ताशी ४१ किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. यासह, पावसाची ४०% शक्यता आहे. दिवसा हलक्या रिमझिम पावसाची शक्यता फक्त १०% आहे, परंतु संध्याकाळी मोठ्या पावसाचा धोका वाढू शकतो.
आतापर्यंत २७ टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यात टीम इंडियाने १५ सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे. तर आफ्रिकन संघाने भारताविरुद्ध ११ विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा निकाल लागला नाही.
भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ: एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हान फरेरा, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, मिहलाली मपोंगवाना, एनक्यूबाबा पीटर, अँडिले सिमेलेन, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्स.