IND vs SA Final : टॉस बनणार बॉस! प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, नाणेफेक जिंकल्यानंतर संघ काय करणार?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Final : टॉस बनणार बॉस! प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, नाणेफेक जिंकल्यानंतर संघ काय करणार?

IND vs SA Final : टॉस बनणार बॉस! प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, नाणेफेक जिंकल्यानंतर संघ काय करणार?

Jun 29, 2024 12:45 PM IST

IND vs SA T20 World cup Final : भारताला या स्पर्धेत आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. दक्षिण आफ्रिकेनेही आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. या जेतेपदाच्या लढतीतही सर्वांच्या नजरा नाणेफेकीकडे असतील.

IND vs SA Final : टॉस बनणार बॉस! प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, नाणेफेक जिंकल्यानंतर संघ काय करणार?
IND vs SA Final : टॉस बनणार बॉस! प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, नाणेफेक जिंकल्यानंतर संघ काय करणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 विश्वचषक २०२४ चा विजेतेपदाचा सामना काही तासांतच सुरू होणार आहे. हा विजेतेपदाचा सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल.

भारताला या स्पर्धेत आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. दक्षिण आफ्रिकेनेही आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. या जेतेपदाच्या लढतीतही सर्वांच्या नजरा नाणेफेकीकडे असतील. सामना रात्री ८ वाजता सुरू होईल आणि टॉस त्याच्या अर्धा तास आधी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय करावे?

कोणत्याही सामन्यातील सर्वात मोठा प्रश्न असतो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय करावे? अनेक वेळा नाणेफेकीच्या वेळी घेतलेला निर्णय पराभवाचे कारण बनतो.

अशा स्थितीत, भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करेल. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पण, केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही. तसेच, मोठ्या सामन्यांमध्ये संघांना प्रथम फलंदाजी करायची असते.

धावांचा पाठलाग करताना ३५% विजय

केन्सिंग्टन ओव्हलच्या ग्राउंड रेकॉर्डवर नजर टाकली तर आतापर्यंत येथे ३१ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला केवळ ११ विजय मिळाले आहेत. म्हणजेच जवळपास ३५ टक्के सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले.

भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला

या मैदानावर भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी झाला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १८१ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा डाव केवळ १३४ धावांवर आटोपला. अंतिम सामन्यातही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १७० धावा केल्या तर याचा पाठलाग करणे जवळपास अशक्य होईल.

फायनलसाठी दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या