मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आजपासून केपटाऊनमध्ये रंगणार भारत-आफ्रिाका दुसरी कसोटी, अशी असेल पीच आणि प्लेइंग इलेव्हन, पाहा

आजपासून केपटाऊनमध्ये रंगणार भारत-आफ्रिाका दुसरी कसोटी, अशी असेल पीच आणि प्लेइंग इलेव्हन, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 03, 2024 10:17 AM IST

IND vs SA 2nd Test Match Preview : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे झाला. त्या सामन्यात आफ्रिकेने एक डाव आणि ३७ धावांनी विजय मिळवला होता.

IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test (PTI)

india vs south africa 2nd test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (३ जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना केपटाऊनच्या न्यू लँड्स क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजेपासून सामन्याला सुरुवात होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे झाला. त्या सामन्यात आफ्रिकेने एक डाव आणि ३७ धावांनी विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत आफ्रिका या मालिकेत आघाडीवर आहे. तर भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

पण, केपटाऊनच्या न्यू लॅंड्स स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. येथे भारतीय संघाने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी ४ सामने गमावले आहेत. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.

केपटाऊनची पीच रिपोर्ट

न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर गवत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळण्याची अपेक्षा आहे. येथील हवामानही वेगवान गोलंदाजांना मदत करते. सामन्यादरम्यान हलक्या स्वरुपाचे वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे चेंडूला अधिक मुव्हमेंट मिळेल. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना खेळणे कठीण जाईल, नंतर फिरकी गोलंदाजांनाही येथे मदत मिळेल.

असं असेल केपटाऊनचं हवामान 

चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. कारण केपटाऊनचे हवामान पाच दिवस स्वच्छ राहणार आहे. त्यामुळे सामन्यात कोणताही अडथळा येणार नाही.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा/मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, कीगन पीटरसन, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यान्सेन, केशव महाराज/लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi