मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs SA Test : फुकटात बघा भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना; कधी, कुठे, कसा? वाचा

Ind vs SA Test : फुकटात बघा भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना; कधी, कुठे, कसा? वाचा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 02, 2024 12:00 PM IST

India vs South Africa 2nd Test Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला येत्या ३ जानेवारीपासून सुरुवात होईल.

IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test (AFP)

India vs South Africa Capetown Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये ३ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कधी, कुठे आणि कसे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला येत्या ३ जानेवारीपासून सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना पाहता येईल. तसेच डिस्ने प्लस होस्टद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे, यासाठी प्रेक्षकांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. फुकटात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आनंद लुटता येणार आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर वनडे आणि कसोटीतून निवृत्त!

भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

दक्षिण आफ्रिकेचा संघ:

डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जोर्जी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जेन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ट्रायस्टन मुल्डर, स्टब्स.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi