IND vs SA Capetown Test: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभव पत्कारावा लागला. या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना उद्यापासून केपटाऊन येथे खेळला जाणार आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात कोणाचे पारडे जड राहिले? हे जाणून घेऊयात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण ४३ कसोटी सामने खेळले गेले. यापैकी १८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. तर, भारताला १५ सामन्यात विजय मिळवता आला आहे. याशिवाय, १० सामने अनिर्णित ठरले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला येत्या ३ जानेवारीपासून सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना पाहता येईल. तसेच डिस्ने प्लस होस्टद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे, यासाठी प्रेक्षकांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. फुकटात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आनंद लुटता येणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा/आवेश खान.
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडीय.
संबंधित बातम्या