india vs south africa 2nd test day 1 scorecard : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत गारद झाला. याच्या प्रत्युत्तरात भारताने १५३ धावा केल्या आणि ९८ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. आता पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातील धावसंख्या ३ बाद ६२ धावा अशी आहे.
पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे अजूनही ३६ धावांची आघाडी आहे. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून ही मालिका बरोबरीत सोडवायची आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ६२ धावा केल्या आहेत. एडन मार्कराम (३६) आणि डेव्हिड बेडिंगहॅम (७) नाबाद परतले आहेत. भारताकडे अजूनही ३६ धावांची आघाडी आहे. तर आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील ७ विकेट्स शिल्लक आहेत.
दुसऱ्या डावात भारताकडून मुकेश कुमारने आतापर्यंत २ आणि जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली. डीन एल्गर १२ धावा करून बाद झाला. तर टोनी डीजॉर्ज आणि ट्रिस्टन स्टब्स प्रत्येकी एक धाव करून बाद झाले.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ विकेट घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारताचा पहिला डाव १५३ धावांवर आटोपला. भारताचे केवळ तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने ३९ धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने ३६ आणि विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुललाच आपले खाते उघडता आले. त्याने ८ धावा केल्या.
यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार हे फलंदाज शुन्यावर बाद झाले. मुकेश कुमार एकही चेंडूचा सामना न करता नाबाद राहिला.
आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.