India vs South Africa 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (१० नोव्हेंबर) गेबेरहा येथे खेळला जात आहे. सेंट जॉर्ज पार्कच्या स्टेडियमवर आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.
भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करणार आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.
सूर्यकुमार यादव - आम्हाला प्रथम फलंदाजी करून पहिल्या सामन्याप्रमाणेच खेळायचे आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील कामगिरीमुळे आनंदी आहे आणि प्रत्येक सामन्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते. आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
एडन मार्कराम - आम्ही पुन्हा प्रथम गोलंदाजी करू. येथे पाऊस येऊ शकतो आणि आशा आहे की गोलंदाज त्याचा योग्य वापर करू शकतील. आता सावरलेल्या पॅट्रिक क्रुगरच्या जागी रीझा हेंड्रिक्स आला आहे. आम्हाला निकालाची चिंता नाही.
दरम्यान, पहिला सामना ६१ धावांनी जिंकून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच, गेल्या ११ सामन्यांपासून भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० क्रिकेटमध्ये सलग १२ सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करू शकते.
खेळपट्टीवर नजर टाकली तर सामन्याच्या आधी पाऊस पडला होता. खेळपट्टीवर नेहमीपेक्षा जास्त गवत आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाज डावाच्या सुरुवातीला खूप प्रभावी ठरू शकतात. याशिवाय वेगवान गोलंदाजांनाही सुरुवातीला स्विंग मिळणे अपेक्षित आहे.