IND vs SA : सूर्याच्या नेतृत्वात दोन वेगवान गोलंदाज पदार्पण करणार? आफ्रिकेविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : सूर्याच्या नेतृत्वात दोन वेगवान गोलंदाज पदार्पण करणार? आफ्रिकेविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

IND vs SA : सूर्याच्या नेतृत्वात दोन वेगवान गोलंदाज पदार्पण करणार? आफ्रिकेविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Nov 08, 2024 11:21 AM IST

IND vs SA 1st T20I : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना डरबनमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघात काही बदल झाले आहेत ज्यामुळे नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते.

IND vs SA : सूर्याच्या नेतृत्वात दोन वेगवान गोलंदाज पदार्पण करणार? आफ्रिकेविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
IND vs SA : सूर्याच्या नेतृत्वात दोन वेगवान गोलंदाज पदार्पण करणार? आफ्रिकेविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना  आज (८ नोव्हेंबर) डरबन येथे खेळला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघात काही बदल केले आहेत. ज्यामुळे नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. 

मात्र सूर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापनाच्या नजरा बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमधील बहुतांश खेळाडूंनाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात उतरवण्याकडे असतील.

भारतीय संघात रियान पराग, मयंक यादव आणि शिवम दुबे यांना दुखापत झाल्याने रमणदीप सिंग, विजयकुमार वैश्याख आणि यश दयाल यांना संधी मिळाली. आता त्यांच्यात पदार्पणाची संधी कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशविरुद्ध भारतीय संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनला अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी दिली. संजूला पहिल्या दोन सामन्यात काही विशेष करता आले नाही, पण तिसऱ्या टी-२० मध्ये त्याने शतक झळकावत दक्षिण आफ्रिका मालिकेचे तिकीट पक्के केले. 

आता हा दौरा त्याच्या आगामी कारकिर्दीचा निर्णय घेऊ शकतो. त्याचबरोबर अभिषेक शर्मासाठीही हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे, हा स्फोटक खेळाडू बांगलादेशविरुद्ध खराब फ्लॉप होत होता.

याशिवाय मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिलक वर्मा आणि फिनिशरच्या भूमिकेत हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग असतील. गरज पडल्यास अक्षर पटेलही फलंदाजीत मोलाचे योगदान देऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या गोलंदाजी विभागात काही बदल होऊ शकतात. डरबनच्या संथ खेळपट्टीवर अक्षर पटेल  आणि वरुण चक्रवर्ती हे दोन फिरकीपटू खेळू शकतात. 

गोलंदाजी विभाग असा असू शकतो

यानंतर गोलंदाजी विभागात तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली जाऊ शकते, ज्यामध्ये अर्शदीप सिंग, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांच्या नावाचा समावेश केला जाऊ शकतो. यश आणि विजय आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात.

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, विजयकुमार वैशाख,, वरुण चक्रवर्ती, यश दयाल आणि अर्शदीप सिंग.

Whats_app_banner