T20 World Cup 2024 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 विश्वचषक २०२४ चा हा सामना न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.
न्यूयॉर्कमधील नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा शानदार सामना सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता) सुरू होईल.
पण पावसामुळे सामन्याची मजा खराब होऊ शकते. हवामान खात्याच्या मते, रविवारी न्यूयॉर्कमध्ये हलका पाऊस पडू शकतो. स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे चढ्या दराने विकली गेली आहेत. पाऊस पडला तर चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.
न्यूयॉर्कमध्ये रविवारचा दिवस अल्हाददायी असेल. पण पावसाची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. जर पाऊस पडला तर खेळाला विलंब होऊ शकतो. नाणेफेकीपूर्वी पाऊस पडल्यास सामना उशीराने सुरू होऊ शकतो.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नाणेफेकीच्या वेळी ४० ते ५०% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, दुपारी १ वाजता पावसाची शक्यता १०% पर्यंत कमी होईल, परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा ४०% पर्यंत पोहोचू शकेल.
Accuweather नुसार, आज रविवार, ९ जून रोजी पावसाची शक्यता ४२ % आहे. तापमान २५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५८% राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे नाणेफेक होण्यास विलंब होऊ शकतो, परंतु सध्याच्या हवामान अंदाजानुसार सामना नियोजित वेळेनुसार खेळवला जाऊ शकतो.
पाकिस्तानसाठी ही स्पर्धा सोपी नसेल. त्याला टीम इंडियाकडून कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर बाबर आझमच्या संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता ते पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाबर तसेच मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान/सायम अयुब, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ.
संबंधित बातम्या