IND vs PAK: क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज एकमेकांशी भिडणार; येथे पाहा भारत-पाकिस्तान सामना!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK: क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज एकमेकांशी भिडणार; येथे पाहा भारत-पाकिस्तान सामना!

IND vs PAK: क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज एकमेकांशी भिडणार; येथे पाहा भारत-पाकिस्तान सामना!

Jun 09, 2024 08:11 AM IST

India vs Pakistan Live Streaming: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील १९ वा सामना खेळला जाणार आहे.

भारत- पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठे बघायचा?
भारत- पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठे बघायचा?

T20 World Cup 2024: क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील १९ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पाकिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे टीम इंडियाने त्यांच्या पहिल्याच सामन्यात आयर्लंडचा पराभव केला. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे लाईव्ह पाहायचा, हे जाणून घेऊयात.

कधी, कुठे पाहायचा सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (९ जून २०२४) रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. टी-२० विश्वचषक २०२४ चे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. स्टार नेटवर्क व्यतिरिक्त हा सामना दूरदर्शनवरही मोफत पाहता येणार आहे. सामन्याचे थेट प्रवाह Disney+Hotstar वर उपलब्ध असेल. तसेच या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि सामन्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हिंदुस्थान टाईम्स मराठीच्या वेबसाईटला भेट द्या.

खेळपट्टी

नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी चर्चेचा विषय बनली आहे, त्याच्या अनिश्चिततेमुळे आधीच मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे, ही चिंता आयसीसीने अधिकृतपणे मान्य केली आहे. या कमी धावसंख्येच्या परिस्थितीमुळे अमेरिकन बाजारपेठेत क्रिकेटला चालना मिळू शकेल का, याबाबत माजी खेळाडूंनी साशंकता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना

अमेरिकेकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर गुरुवारी उशिरा न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघाला तीन पैकी दोन सामने जिंकायचे आहेत. भारताविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या पात्रतेच्या आशांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल.

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर, इमाद वसीम, अबरार अहमद, सैम अयुब अब्बास आफ्रिदी.

Whats_app_banner