मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK Pitch : फलंदाज की गोलंदाज… भारत-पाकिस्तान सामन्यात पीच कोणाला मदत करेल? जाणून घ्या

IND vs PAK Pitch : फलंदाज की गोलंदाज… भारत-पाकिस्तान सामन्यात पीच कोणाला मदत करेल? जाणून घ्या

Jun 03, 2024 10:15 PM IST

IND vs PAK Pitch Report : टी-20 विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. खेळपट्टी फलंदाज की गोलंदाज कोणाला मदत करेल? ते जाणून घ्या.

IND vs PAK Pitch : फलंदाज की गोलंदाज… भारत-पाकिस्तान सामन्यात पीच कोणाला मदत करेल? जाणून घ्या
IND vs PAK Pitch : फलंदाज की गोलंदाज… भारत-पाकिस्तान सामन्यात पीच कोणाला मदत करेल? जाणून घ्या

IND VS PAK pitch New York : टी-20 वर्ल्डकप २०२४ वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने खेळला जात आहे. स्पर्धेतील १६ सामने अमेरिकेच्या मैदानावर खेळले जाणार आहेत आणि अंतिम सामन्यासह इतर ३५ सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना आधीच चर्चेचा विषय आहे, जो ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

अमेरिकेत अगदी नवीन क्रिकेट मैदाने बांधली गेली आहेत. त्यामुळे तेथील पीचबद्दल अद्याप फारसा अंदाज आलेला नाही. न्यूयॉर्कची पीच वेगवान गोलंदाजाला मदत करेल की फिरकी गोलंदाजी अधिक प्रभावी होईल, हे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

खेळपट्टीची मदत कोणाला मिळणार?

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना झाला आहे. त्या सामन्यात भारताने प्रथम खेळताना १८२ धावा केल्या होत्या, मात्र बांगलादेशने केवळ १२२ धावाच केल्या होत्या. या सामन्यात दोन्ही डावात एकूण १४ विकेट पडल्या, त्यापैकी २ खेळाडू निवृत्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.

त्यामुळे प्रत्यक्षात सामन्यात एकूण १२ बळी पडले, त्यापैकी ८ वेगवान गोलंदाजांनी घेतले.

नासाऊ स्टेडियममध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळाल्याचा दुसरा सर्वात मोठा पुरावा म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणामुळे श्रीलंकेची फलंदाजी फ्लॉप झाली. कागिसो रबाडा आणि ॲनरिक नॉर्खिया यांना मिळालेली घातक उसळी कोणत्याही फलंदाजीसाठी अडचणी निर्माण करू शकते.

भविष्यात खेळपट्टीतील उसळी अशीच राहिली, तर वेगवान गोलंदाज भारत-पाकिस्तान सामन्यात कहर करू शकतात. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे गोलंदाज चमकदार कामगिरी करू शकता. दुसरीकडे, पाकिस्तानकडेही मोहम्मद आमिर, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह हे त्रिकूट आहे, ज्यांचा वेग सर्वोत्तम फलंदाजांसाठीही अडचणी निर्माण करू शकतो.

ऑस्ट्रेलियातून आली ड्रॉप-इन पीच

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये असलेल्या सर्व गोष्टी अमेरिकेतच तयार केल्या गेल्या आहेत, परंतु पीच ही ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेडमधून आली आहे. परदेशातून आणलेली खेळपट्टी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मैदानात बसवण्यात आली होती. या खेळपट्ट्या प्रत्यक्षात जॉर्जियामार्गे फ्लोरिडा येथे पोहोचल्या. पीच क्युरेशनचे काम डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाले. मैदानात खेळण्यासाठी ४ खेळपट्ट्या, तर सराव क्षेत्रासाठी ६ खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४