मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK New York Weather : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस येणार? रविवारी असं असेल न्यूयॉर्कचं हवामान, पाहा

IND vs PAK New York Weather : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस येणार? रविवारी असं असेल न्यूयॉर्कचं हवामान, पाहा

Jun 08, 2024 05:45 PM IST

IND vs PAK New York Weather : न्यूयॉर्कमधील नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा शानदार सामना सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता) सुरू होईल.

IND vs PAK New York Weather : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस येणार? रविवारी असं असेल न्यूयॉर्कचं हवामान, पाहा
IND vs PAK New York Weather : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस येणार? रविवारी असं असेल न्यूयॉर्कचं हवामान, पाहा

T20 World Cup 2024 IND vs PAK  : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना अर्थातच भारत आणि पाकिस्तान महामुकाबला रविवारी (९ जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारताने २००७ मध्ये तर पाकिस्तानने २००९ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. दोन्ही संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. अशा स्थितीत या सामन्यात हवामान कसे असेल, याची चिंता चाहत्यांना सतावत आहे. कारण या वर्ल्डकपमधील काही सामन्यांमध्ये पावसाचा अडथळला आहे.

भारत-पाकिस्तान हवामान 

न्यूयॉर्कमधील नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा शानदार सामना सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता) सुरू होईल. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नाणेफेकीच्या वेळी ४० ते ५०% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, दुपारी १ वाजता पावसाची शक्यता १०% पर्यंत कमी होईल, परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा ४०% पर्यंत पोहोचू शकेल.

७ जून रोजी न्यूयॉर्कचे हवामान

Accuweather नुसार, रविवार, ९ जून रोजी पावसाची शक्यता ४२ % आहे. तापमान २५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५८% राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे नाणेफेक होण्यास विलंब होऊ शकतो, परंतु सध्याच्या हवामान अंदाजानुसार सामना नियोजित वेळेनुसार खेळवला जाऊ शकतो.

भारत-पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ/मोहम्मद अमीर, नसीम शाह, अबरार अहमद.

टी-२० वर्ल्डकप २०२४