मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Pak Live Streaming : भारत-पाकिस्तान थरार फ्रीमध्ये असा पाहा, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Ind vs Pak Live Streaming : भारत-पाकिस्तान थरार फ्रीमध्ये असा पाहा, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Jun 08, 2024 12:28 PM IST

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Streaming : पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा. बाबर आझम आणि रोहित शर्मा यांचे संघ उद्या रविवारी ९ जून रोजी टी-20 विश्वचषकात आमनेसामने येतील.

India vs Pakistan Live streaming t20 world cup 2024
India vs Pakistan Live streaming t20 world cup 2024 (REUTERS)

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Streaming : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना अर्थातच भारत आणि पाकिस्तान महामुकाबला रविवारी (९ जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पण चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की हा सामना विनामूल्य कुठे आणि कसा पाहायचा? अशा परिस्थितीत, येथे जाणून घ्या की तुम्ही भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार कुठे अनुभवू शकता.

भारत-पाकिस्तान सामना फ्रीमध्ये असा पाहा

टी-20 विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. वेबसाइट, ओटीटी ॲप आणि टीव्ही चॅनलवर तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही DD नॅशनल या चॅनेलवर मोफत पाहू शकता.

वेबसाइट: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना वेबसाइटवर पाहण्यासाठी तुम्हाला hotstar.com वर जावे लागेल. पण तुम्ही इथे फुकटात सामन्याचा आनंद घेऊ शकत नाही.

OTT ॲप: तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या शानदार सामन्याचा आनंद घेऊ शकता.

टीव्ही चॅनल: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाषांमधील चॅनल पाहू शकता.

यामध्ये स्टार स्पोर्ट्स १ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स २ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. DD स्पोर्ट्स या चॅनेलवरही तुम्ही भारत-पाकिस्तान सामना पाहू शकता.

भारत-पाकिस्तान पीच रिपोर्ट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर खेळला जाईल. या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक राहिली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यातही तेच पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागला. अशा स्थितीत ९ जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

खेळपट्टीची असमान उसळी फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकते. चाहतेही या खेळपट्टीवर खूश नसून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. या आव्हानात्मक खेळपट्टीवर भारत आणि पाकिस्तानचे फलंदाज आपली कसब दाखवू शकतील का, हे पाहणे बाकी आहे.

भारत-पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.

टी-२० वर्ल्डकप २०२४