
India vs Paksiatn Dream 11 Team Prediction : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा मेगा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (२३ फेब्रुवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांना स्फोटक सामन्याची अपेक्षा आहे.
या स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
या सामन्यासाठी दोन्ही संघांबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानच्या संघात बदल करण्यात आला आहे. संघाचा सलामीवीर फखर जमान दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर असून त्याच्या जागी इमाम उल हकचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताबद्दल बोलायचे झाले तर या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नाही. कर्णधार रोहित शर्माला त्याच्या विजयी संयोजनात छेडछाड करायला आवडणार नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या आधी हर्षित राणाला संघात स्थान दिले जाईल. मोहम्मद शमी गोलंदाजीचे नेतृत्व करेल. या सामन्यात कुलदीप यादवही प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल.
यष्टिरक्षक - केएल राहुल, मोहम्मद रिझवान
फलंदाज- रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली
अष्टपैलू- अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, सलमान अली आगा
गोलंदाज- मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अबरार अहमद
कर्णधार- शुभमन गिल
उपकर्णधार- हार्दिक पंड्या
संबंधित बातम्या
