भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरूत खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. शुभमन गिलला ब्रेक देण्यात आला आहे. तर सरफराज खानला संधी देण्यात आली आहे. तर आकाश दीपच्या जागी कुलदीप यादव याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला आहे.
कर्णधार रोहितने टॉसनंतर सांगितले की, शुभमन गिल १०० टक्के फिट नाही. त्याच्या जागी सरफराज खानचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज आकाश दीपच्या जागी कुलदीप यादव प्लेइंग-११ मध्ये परतला आहे.
त्याचवेळी टॉम लॅथम म्हणाला, 'विकेट झाकून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे आशा आहे की आम्ही सुरुवातीला चेंडूसह पीचचा चांगला वापर करू शकू. हवामान खराब आहे, त्यामुळे आम्ही येथे चांगली तयारी करू शकलो नाही. एजाज पटेलसोबत तीन वेगवान खेळतील. आमच्याकडे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत जे फिरकी गोलंदाजीही करतात.
न्यूझीलंडकडून पहिल्या कसोटीत केन विल्यमसन खेळणार नाही. त्याला श्रीलंका दौऱ्यात दुखापत झाली होती. यातून तो अद्याप सावरू शकलेला नाही. विल्यमसनचा किवी संघात समावेश असला तरी तो उर्वरित दोन कसोटी सामने खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आपल्या उरलेल्या आठपैकी ५ कसोटी जिंकणे आवश्यक आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ'रुर्के.
संबंधित बातम्या