पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने २५९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर त्रिफळाचीत झाला.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. रोहित शर्मा शून्यावर आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला होता. सोशल मीडिया यूजर्स फनी मीम्स शेअर करुन रोहितला ट्रोल करत आहेत. रोहित शर्मावर बनलेले हे मजेदार मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरत नाही.
पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला किवी संघ २५९ धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक ७६ धावा केल्या. याशिवाय बंगळुरू कसोटीचा हिरो रचिन रवींद्रने ६५ धावांचे योगदान दिले. तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट घेतल्या.
या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने २५९ धावा केल्या होत्या. संघाच्या १९७ धावांत केवळ तीन विकेट्स होत्या. मात्र त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ७ तर अश्विनने ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात खराब फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशीच्या (२५ ऑक्टोबर) लंचपर्यंत भारताने ७ बाद ११० धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत होते.
संबंधित बातम्या