Ind vs Nz : न्यूझीलंडने मुंबईत इतिहास घडवला, कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० ने धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Nz : न्यूझीलंडने मुंबईत इतिहास घडवला, कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० ने धुव्वा

Ind vs Nz : न्यूझीलंडने मुंबईत इतिहास घडवला, कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० ने धुव्वा

Nov 03, 2024 02:58 PM IST

ind vs nz mumbai test highlights : न्यूझीलंडने तीन X कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० असा पराभव केला आहे.

Ind vs Nz : न्यूझीलंडने मुंबईत इतिहास घडवला, कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० ने धुव्वा
Ind vs Nz : न्यूझीलंडने मुंबईत इतिहास घडवला, कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० ने धुव्वा

 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावली आहे. भारताने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना २५ धावांनी गमावला. भारतात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा व्हाईटवॉश करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ आहे.

टीम इंडियाने १९३३-३४ मध्ये पहिल्यांदा घरच्या भूमीवर कसोटी मालिका खेळली, जी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका होती, ज्यामध्ये इंग्लंडने २-० ने विजय मिळवला.

आता भारतात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ३-० ने पराभूत करणारा न्यूझीलंड हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

१९३३ पासून पाहिले तर तब्बल ९१ वर्षांनंतर टीम इंडियाला ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

टीम इंडियाला १४७ धावाही करता आल्या नाहीत

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य होते. छोट्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अनेकवेळा फसला. संघाने कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट १३ धावांवर गमावली, त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया शेवटपर्यंत थांबली नाही.

भारताने अवघ्या २९ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. हतबल झालेल्या टीम इंडियाला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. १४७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया१ १२१ धावांवरच गारद झाली.

भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ६४ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला.

सामन्यात काय घडलं?

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंड फलंदाजीला उतरला आणि अवघ्या १७४ धावांवर ऑलआऊट झाला आणि टीम इंडियासमोर १ धावांचे लक्ष्य ठेवले. इथून टीम इंडिया सहज जिंकेल असे वाटत होते, पण दुर्दैवाने टीम इंडियाने १२१ रन्सवर ऑलआऊट होऊन मॅच गमावली.

 

Whats_app_banner