IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी भारतच जिंकणार, आज 'या' तीन कारणांमुळे न्यूझीलंडचा पराभव होणार, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी भारतच जिंकणार, आज 'या' तीन कारणांमुळे न्यूझीलंडचा पराभव होणार, पाहा

IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी भारतच जिंकणार, आज 'या' तीन कारणांमुळे न्यूझीलंडचा पराभव होणार, पाहा

Published Mar 09, 2025 10:05 AM IST

Champions Trophy 2025 Final : रेकॉर्डवर नजर टाकली तर टीम इंडियाचा न्यूझीलंडवर वरचष्मा दिसतो. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात भारताने ६१ सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत.

IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी भारतच जिंकणार, 'या' तीन कारणांमुळे न्यूझीलंडचा पराभव होणार, पाहा
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी भारतच जिंकणार, 'या' तीन कारणांमुळे न्यूझीलंडचा पराभव होणार, पाहा (AP)

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या जेतेपदाच्या अगदी जवळ आला आहे. आज रविवारी (९ मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

रोहितसोबतच विराट कोहलीसाठीही हा सामना महत्त्वाचा असेल. जर आपण भारताच्या विजयाच्या घटकांबद्दल बोललो तर ते विजेतेपदावर कब्जा करू शकतो. यामध्ये तीन घटक महत्त्वाचे ठरू शकतात.

रेकॉर्डवर नजर टाकली तर टीम इंडियाचा न्यूझीलंडवर वरचष्मा दिसतो. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात भारताने ६१ सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत.

या स्पर्धेत भारत-न्यूझीलंड दुसऱ्यांदा भिडणार

भारतीय संघ आता पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारताने ग्रुप मॅचमध्ये न्यूझीलंडचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. आता दुबईत खेळवली जाणारी फायनलही जिंकू शकते. भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजीने चमत्कार घडवला तर जेतेपदावर कब्जा होऊ शकतो.

भारताचे गोलंदाजी आक्रमण घातक

गोलंदाजी आक्रमण हा टीम इंडियाच्या विजयात सर्वात मोठा घटक ठरू शकतो. मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती यांनी आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. शमीने ४ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. तर वरुण चक्रवर्तीने केवळ २ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. शमी आणि चक्रवर्ती अंतिम फेरीतही चमत्कार करू शकतात. यासह अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनीही गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे.

टीम इंडियाची मजबूत फलंदाजी

भारतीय संघाकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरसारखे बलवान फलंदाज आहेत. रोहित आणि शुभमन गिल टीम इंडियासाठी ओपनिंग करू शकतात.

ही जोडी जमली नाही तरी कोहली आणि अय्यर हे भारताचा डाव सांभाळू शकतात. यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्या मधल्या फळीत आपली ताकद दाखवू शकतात. या विजयात टीम इंडियाचे फलंदाज महत्त्वाचे ठरू शकतात.

उत्तम क्षेत्ररक्षण 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आतापर्यंत ४ आयसीसी स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी20 विश्वचषकही जिंकला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताच्या विजयात रोहित महत्त्वाचा ठरला आहे. त्याच्यासोबतच संघाचे क्षेत्ररक्षणही महत्त्वाचे ठरले आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या