IND vs NZ : न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, टीम इंडियात तीन बदल, सरफराज की केएल राहुल कोण बाहेर? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ : न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, टीम इंडियात तीन बदल, सरफराज की केएल राहुल कोण बाहेर? पाहा

IND vs NZ : न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, टीम इंडियात तीन बदल, सरफराज की केएल राहुल कोण बाहेर? पाहा

Oct 24, 2024 09:25 AM IST

IND vs NZ 2nd Test Pune : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून पुण्यात खेळवला जात आहे.

IND vs NZ : न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, टीम इंडियात तीन बदल, सरफराज की केएल राहुल कोण बाहेर? पाहा
IND vs NZ : न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, टीम इंडियात तीन बदल, सरफराज की केएल राहुल कोण बाहेर? पाहा (AFP)

IND vs NZ 2nd Pune Test Toss and Playing XI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले आहेत. मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर. तर आकाशदीप, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर मॅट हेन्रीच्या जागी मिचेल सँटनरचा किवी संघात समावेश करण्यात आला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओरूर्क.

पुण्याची खेळपट्टी कशी असेल?

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याच्या स्टेडियमवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

येथे पहिल्या डावाची सरासरी ४३० धावा आणि दुसऱ्या डावाची सरासरी १९० धावा आहे. तिसऱ्या डावात सरासरी २३७ धावा आणि चौथ्या डावात सरासरी १०७ धावा केल्या जातात.

येथे सर्वात मोठी धावसंख्या ५ बाद ६०५ ही भारताच्या नावावर आहे, जी त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती केली. तर सर्वात कमी स्कोअर सर्वबाद १०५ ही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. पुणे येथील पीच फिरकीपटूंना मदत करणारी आहे. या टर्निंग ट्रॅकवर चौथ्या डावात धावा करणे अत्यंत अवघड असेल.

पुण्याच्या स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड

पुणे येथील स्टेडियमवर भारताने एक सामना जिंकला आहे तर एक सामना गमावला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे हे स्टेडिय सुब्रत रॉय सहारा स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते. या मैदानावर आतापर्यंत केवळ दोनच कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताचा रेकॉर्ड संमिश्र आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा एका डावाने पराभव केला. त्यावेळीही विराट कोहली कर्णधार होता. विराट कोहलीच्या २५४ धावांच्या नाबाद खेळीने प्रोटीज संघाचा एक डाव आणि १३७ धावांनी पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Whats_app_banner