IND vs NZ : सँटनरचे ७ विकेट, टॉम लॅथमचे अर्धशतक... दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवला, पुणे कसोटी रोमहर्षक स्थितीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ : सँटनरचे ७ विकेट, टॉम लॅथमचे अर्धशतक... दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवला, पुणे कसोटी रोमहर्षक स्थितीत

IND vs NZ : सँटनरचे ७ विकेट, टॉम लॅथमचे अर्धशतक... दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवला, पुणे कसोटी रोमहर्षक स्थितीत

Updated Oct 25, 2024 05:04 PM IST

IND vs NZ 2nd Test Day 2 Highlights : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (२५ ऑक्टोबर) खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडची एकूण आघाडी ३०१ धावांची झाली आहे.

IND vs NZ : सँटनरचे ७ विकेट, टॉम लॅथमचे अर्धशतक... दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवला, पुणे कसोटी रोमहर्षक स्थितीत
IND vs NZ : सँटनरचे ७ विकेट, टॉम लॅथमचे अर्धशतक... दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवला, पुणे कसोटी रोमहर्षक स्थितीत (PTI)

भारत आणि न्यूझीलंड पुणे कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ न्यूझीलंडच्या नावावर राहिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने त्यांच्या दुसऱ्या डावात ५ गडी गमावून १९८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची एकूण आघाडी आता ३०१ धावांवर पोहोचली आहे आणि त्यांच्या पाच विकेट्स शिल्लक आहेत. अशा स्थितीत पुणे कसोटीवर न्यूझीलंडने आपला दबदबा निर्माण केला आहे.

तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्या डावात १५६ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने ७ विकेट घेतल्या.

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात काय घडलं?

न्यूझीलंडने दुसऱ्या डावाची सुरुवात सावधपणे केली. न्यूझीलंडची पहिली विकेट ३६ धावांवर डेव्हन कॉनवे (१७) च्या रूपाने पडली. तो वॉशिंग्टन सुंदरचा बळी ठरला. न्यूझीलंड संघाला ७८ धावांवर दुसरा धक्का बसला, जेव्हा अश्विनने विल यंगला (२३) फिरकीत पायचीत केले.

त्यानंतर सुंदरने रचिन रवींद्रला (९) बोल्ड केले. रवींद्र बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ८९/३ अशी होती. यानंतर सुंदरने डॅरिल मिशेल (१८) यालाही बाद केले. मिचेल एरियल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद झाला.

येथून कर्णधार टॉम लॅथम आणि यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू आऊट करून सुंदरने ही भागीदारी संपवली. १३३ धावांचा सामना करताना लॅथमने १० चौकारांसह ८६ धावा केल्या. येथून टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी किवीजचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

भारताचा पहिला डाव

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या १५६धावांवर आटोपला, त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात १०३  धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा टॉम ब्लंडेल ३० आणि ग्लेन फिलिप्स ९ धावांवर खेळत होते.

भारताने आज दुसऱ्या दिवशीचा खेळ कालच्या १ बाद १६ धावांवरून सुरु केला. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळला. सँटनरने ५३ धावांत ७ बळी घेतले.

 त्याआधी भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. तिसऱ्याच षटकात टीम साऊदीच्या गोलंदाजीवर भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने ९ चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही.

यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी आज दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात केली. भारतीय संघाची धावसंख्या ५० धावांवर पोहोचली तेव्हा टीम इंडियाला दुसरा धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला, गिल (३०) मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. यानंतर विराट कोहली आला जो फक्त १ धावा काढून बाद झाला. कोहली मिचेल सँटनरच्या फुल टॉस बॉलवर क्लीन बोल्ड झाला.

दुसरीकडे, सावध खेळणारा यशस्वी जैस्वाल ३० धावांवर ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर डॅरिल मिशेलकडे झेलबाद झाला. जैस्वाल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत (१८) देखील ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. पंत बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ८३/५ होती.

यानंतर काही वेळातच सँटनरच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना सर्फराज खान (११) विल्यम ओ'रुर्केकरवी झेलबाद झाला. अश्विन बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ७ बाद १०३ धावा होती. यानंतर रवींद्र जडेजाने (३८) संघर्ष केला. पण तोही सँटनरचाही बळी ठरला. आकाश दीप (६) आणि बुमराह (०) हेही सॅन्टनरचे बळी ठरले. वॉशिंग्टन सुंदर १८ धावांवर नाबाद राहिला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या