भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (१६ ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू झाला. पण पावसामुळे पहिल्या दिवशी टॉस होऊ शकला नाही. आता आज (१७ ऑक्टोबक) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या सामन्याचा टॉस झाला असून टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने संपूर्ण खेळ खराब केला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सामना पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. अशा स्थितीत भारत-न्यूझीलंड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बंगळुरूमध्ये हवामान कसे असेल, ते जाणून घेऊया.
पहिल्या दिवशीचा खेळ पावसात वाहून गेल्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. तर वेदर रिपोर्ट्सनुसार दुसऱ्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Accuweather नुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी बेंगळुरूमध्ये सुमारे पाऊस पडण्याची ५० टक्के शक्यता आहे. याशिवाय दुपारनंतर जवळपास पाऊस पडण्याची ४० टक्के शक्यता आहे. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या दिवशी चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. शुभमन गिलला ब्रेक देण्यात आला आहे. तर सरफराज खानला संधी देण्यात आली आहे. तर आकाश दीपच्या जागी कुलदीप यादव याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ'रुर्के.