T20 World Cup 2024 IND vs IRE : टी-20 विश्वचषक २०२४ चा ८ वा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. दोघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
हा सामना अ गटातील दुसरा सामना आहे. अशा परिस्थितीत न्यूयॉर्कच्या हवामानाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भारताचा पहिला सामना पावसामुळे खराब होण्याची भीती चाहत्यांना आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, न्यूयॉर्कमध्ये सकाळी आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे आणि तापमान ३० डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. तथापि, सामन्यादरम्यान हलका पाऊस किंवा वादळाचीही शक्यता आहे. वारा नैऋत्य दिशेकडून ताशी १५ ते २५ किमी वेगाने वाहू शकतो आणि आर्द्रता ५४% असणे अपेक्षित आहे.
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे, ही अशी खेळपट्टी आहे, जी दुसऱ्या ठिकाणी बनवली गेली आणि नंतर या स्टेडियममध्ये आणून बसवली गेली आहे.
वास्तविक, येथील खेळपट्टीसाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथील मातीचा वापर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर चांगली उसळी पाहायला मिळते, त्यामुळेच नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवरही बाउन्स दिसला.
याआघीच्या सामन्यात म्हणजेच श्रीलंका-आफ्रिका सामन्यातील खेळपट्टी संथ दिसत होती आणि आऊटफील्डही खूप संथ होते, ज्यामुळे फलंदाजांना चौकार आणि षटकार मारण्यात अडचण निर्माण झाली होती. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना फायदा मिळू शकतो.
जसा दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडा यांनी गेल्या सामन्यात केला होता. याशिवाय बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात हार्दिक पांड्याने ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे मनगटात ताकद असलेले फलंदाजही चांगली कामगिरी करू शकतात.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, शिवम दुबे.
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, रॉस अडायर, बॅरी मॅककार्थी, मार्क अडायर, जोशुआ लिटल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम .
संबंधित बातम्या