मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs IRE : भारताची प्रथम गोलंदाजी, संघात कुलदीप-संजूला जागा नाही, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

IND Vs IRE : भारताची प्रथम गोलंदाजी, संघात कुलदीप-संजूला जागा नाही, पाहा दोन्ही प्लेइंग इलेव्हन

Jun 05, 2024 07:37 PM IST

IND Vs IRE T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा आठवा सामना आज (५ जून) भारत आणि आयर्लंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

IND Vs IRE T20 Toss update playing 11
IND Vs IRE T20 Toss update playing 11

IND Vs IRE Toss Update Playing 11 : टी-20 विश्वचषक २०२४ चा आठवा सामना आज (५ जून) भारत आणि आयर्लंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होत असून या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयरिश संघ प्रथम फलंदाजी करेल. हा सामना अ गटातील दुसरा सामना आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टॉस जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, टीम इंडिया ४ वेगवान गोलंदाजांसह खेळणार आहे. यामध्ये बुमराह, अर्शदीप, सिराज आणि हार्दिक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर संघ २ फिरकी अष्टपैलू खेळाडूंसह मैदानात उतरेल. यामध्ये रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. यशस्वी, संजू आणि कुलदीप हा सामना खेळत नाहीत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

भारत-आयर्लंड हेड टू हेड

टीम इंडियाचा आयर्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. आयरिश संघाविरुद्ध भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारत आणि आयर्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने ३ एकदिवसीय सामन्यांमध्येही विजय मिळवला.

भारत वि.आयर्लंड पीच रिपोर्ट

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे, ही अशी खेळपट्टी आहे, जी दुसऱ्या ठिकाणी बनवली गेली आणि नंतर या स्टेडियममध्ये आणून बसवली गेली आहे.

वास्तविक, येथील खेळपट्टीसाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथील मातीचा वापर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर चांगली उसळी पाहायला मिळते, त्यामुळेच नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवरही बाउन्स दिसला.

याआघीच्या सामन्यात म्हणजेच श्रीलंका-आफ्रिका सामन्यातील खेळपट्टी संथ दिसत होती आणि आऊटफील्डही खूप संथ होते, ज्यामुळे फलंदाजांना चौकार आणि षटकार मारण्यात अडचण निर्माण झाली होती. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना फायदा मिळू शकतो.c

टी-२० वर्ल्डकप २०२४