IND Vs IRE : टीम इंडियाची किलर गोलंदाजी, आयर्लंड ९६ धावांत गारद, हार्दिक पंड्याचे तीन विकेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs IRE : टीम इंडियाची किलर गोलंदाजी, आयर्लंड ९६ धावांत गारद, हार्दिक पंड्याचे तीन विकेट

IND Vs IRE : टीम इंडियाची किलर गोलंदाजी, आयर्लंड ९६ धावांत गारद, हार्दिक पंड्याचे तीन विकेट

Jun 05, 2024 09:29 PM IST

IND Vs IRE T20 Scorecard : टी-20 विश्वचषक २०२४ चा आठवा सामना आज (५ जून) भारत आणि आयर्लंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

IND Vs IRE Scorecard T20 World Cup 2024
IND Vs IRE Scorecard T20 World Cup 2024 (AP)

IND Vs IRE Highlights T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा आठवा सामना आज (५ जून) भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळला जात आहे. न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला अवघ्या ९७ धावांत गारद केले. आयर्लंडचे फलंदाज केवळ १६ षटके क्रीजवर टिकू शकले.

यानंतर आता टीम इंडियाला विजयासाठी २० षटकात ९७ धावा कराव्या लागणार आहेत. आयरिश संघाकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १४ चेंडूत २६ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

आयरिश संघाचे केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा ओलांडू शकले आणि उर्वरित ७ फलंदाजांनी १० धावांचा आकडाही ओलांडला नाही. आयर्लंडकडून सर्वाधिक धावा गॅरेथ डेलेनीने केल्या, त्याने १४ चेंडूत २६ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच धुमाकूळ घातला. हार्दिक पंड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. हार्दिकने एकूण ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २ बळी घेत आयर्लंडला मोठी धावसंख्या बनवण्यापासून वंचित ठेवले.

तत्पूर्वी, आयर्लंडची सुरुवात इतकी खराब झाली की पहिल्या ३ षटकांतच संघाने सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंग २ धावा करून बाद झाला आणि अँड्र्यू बार्लबर्नीलाही केवळ ५ धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आयर्लंडची स्कोअर २ गडी गमावून २६ रन्स होती. 

लॉर्कन टकर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, तो १० धावा करून क्रीजवर सेट झाला होता, पण हार्दिक पांड्याने त्याला ७ व्या षटकात क्लीन बोल्ड केले.

हॅरी टेक्टरची बॅटही शांत राहिली, त्याला १६ चेंडू खेळून केवळ ४ धावा करता आल्या. डावाच्या पहिल्या ६१ चेंडूतच संघाने ७ विकेट गमावल्या होत्या आणि स्कोअरबोर्डवर केवळ ४९ धावा झाल्या होत्या. १२व्या षटकात आयर्लंडने ५० धावांचा टप्पा गाठला. मात्र त्याच षटकात अक्षर पटेलने बॅरी मॅकार्थीची विकेट घेतली. दरम्यान, जोशुआ लिटल आणि गॅरेथ डेलेनी यांच्यात २७ धावांची छोटी पण महत्त्वाची भागीदारी झाली, मात्र १४ धावा करून लिटल बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

आयर्लंडने १५ षटकांत ७९ धावा केल्या होत्या आणि फक्त एक विकेट शिल्लक होती. अखेरीस, १६व्या षटकात गॅरेथ डेलेनी धावबाद झाल्याने आयर्लंडचा डाव ९६ धावांवर आटोपला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

Whats_app_banner

संबंधित बातम्या