Why Virat Kohli Is Not Playing 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाचा भाग असणार नाही. गुडघ्याच्या समस्येमुळे किंग कोहली प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा यांनी टीम इंडियासाठी वनडे पदार्पण केले आहे.
चाहते किंग कोहलीच्या वनडेत पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. कोहलीने ऑगस्ट २०२४ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आता मालिकेतील दुसऱ्या वनडेत कोहली भाग घेतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही सहभागी व्हायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून विराट कोहली टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीनंतर म्हणाला, की आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती, पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. सुरुवातीला आक्रमक होऊन नंतर चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
काही वेळा सुट्टी घेणे चांगले असते, ही एक नवीन सुरुवात आहे आणि चांगली कामगिरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा पदार्पण करत आहेत. दुर्दैवाने विराट खेळत नाही. काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड- बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
संबंधित बातम्या