वरुण चक्रवर्ती याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पम केले आहे. त्याने आज (९ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवली. यानंतर वरुणने आपली पहिली वनडे आंतरराष्ट्रीय विकेटदेखील घेतली.
वास्तविक, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एक दिवसीय सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडच्या सलामीवीरांनी १० षटकात ८१ धावा ठोकल्या होत्या. यानंतर वरुण चक्रवर्तीने फिल सॉल्ट याला बाद करत भारतलाा पहिले यश मिळवून दिले.
टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने टी-20 फॉरमॅटमध्ये सातत्याने चमकदार गोलंदाजी करणाऱ्या वरुणला वनडेमध्येही आजमावण्याचा निर्णय घेतला. एकप्रकारे हा निर्णय टीम इंडियासाठी चांगलाच ठरला आणि वरुणने टी-20 सारख्या वनडे फॉरमॅटमध्ये आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे.
पदार्पणाच्या सामन्यातच वरुण चक्रवर्तीने आपली जादू दाखवली आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेतली. वरुण इंग्लंडच्या डावातील ११ षटके टाकायला आला. या षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने धोकादायक फिल सॉल्टला झेलबाद केले. २६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर सॉल्ट मिडऑनवर रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. यासह वरुणने टी-२० नंतर वनडे फॉरमॅटमध्येही विकेटचे खाते उघडले.
वरुण चक्रवर्तीने सॉल्टला बाद केले, त्यावेळी तो सेट झाला होता. बेन डकेटसह त्याने ११ षटकात ८० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. पण त्यानंतर चक्रवर्तीने सॉल्टला बाद करून टीम इंडियाला सामन्यात परत आणले. त्यानंतर काही षटकांनंतर डकेटनेही ६५ धावा करून रवींद्र जडेजाच्या चेंडूवर आपली विकेट दिली.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड- फिल सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.
संबंधित बातम्या