Ind vs Eng Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, या ऑलराउंडरला करा कर्णधार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, या ऑलराउंडरला करा कर्णधार

Ind vs Eng Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, या ऑलराउंडरला करा कर्णधार

Jan 22, 2025 09:22 AM IST

India vs England T20 Match : भारत-इंग्लंड टी-20 मालिकेला आजपासून सरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.

Ind vs Eng Dream 11 Prediction  : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, या ऑलराउंडरला करा कर्णधार
Ind vs Eng Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, या ऑलराउंडरला करा कर्णधार

Ind vs Eng Dream 11 Prediction : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांची मालिका आजपासून (२२ जानेवारी) सुरू होत आहे. या मालिकेच्या एक दिवस आधी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. संघाची कमान स्फोटक फलंदाज जोस बटलरकडे असेल, तर यष्टिरक्षणाची जबाबदारी फिल सॉल्टकडे देण्यात आली आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार असून दोन्ही संघ चुरशीची लढत देतील अशी अपेक्षा आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. २०२४ च्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला कोणत्याही मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही.

त्याचवेळी, इंग्लंडचा संघही जोस बटलरच्या नेतृत्वाखाली मजबूत दिसत आहे, त्यांनी गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला होता.

या खेळाडूंवर नजर राहणार

सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्यासारखे खेळाडू भारतासाठी मॅच विनर ठरू शकतात. त्याच वेळी, जोस बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोनची उपस्थिती इंग्लंडला मजबूत करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत या मालिकेदरम्यान चाहत्यांची नजर या खेळाडूंवर असेल.

भारत-इंग्लंड ड्रीम इलेव्हन टीम १

कर्णधार:  हार्दिक पंड्या 

उपकर्णधार: जोस बटलर 

यष्टिरक्षक: संजू सॅमसन, फिल सॉल्ट 

फलंदाज: सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, जोस बटलर 

अष्टपैलू: हार्दिक पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन 

गोलंदाज: जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, अर्शदीप सिंग

भारत-इंग्लंड ड्रीम इलेव्हन टीम २

कर्णधार: संजू सॅमसन 

उप-कर्णधार: जोफ्रा आर्चर 

विकेटकीपर: संजू सॅमसन, फिल सॉल्ट 

फलंदाज: सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, जोस बटलर 

अष्टपैलू: हार्दिक पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन 

गोलंदाज: जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, अर्शदीप सिंग

दोन्ही संघ 

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : फिल सॉल्ट (विकेट-कीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, आदिल रशीद आणि जोस बटलर (कर्णधार).

Whats_app_banner

संबंधित बातम्या