IND vs ENG Highlights : मुंबई टी-20 सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी धुव्वा, भारताने मालिका ४-१ अशी जिंकली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Highlights : मुंबई टी-20 सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी धुव्वा, भारताने मालिका ४-१ अशी जिंकली

IND vs ENG Highlights : मुंबई टी-20 सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी धुव्वा, भारताने मालिका ४-१ अशी जिंकली

Feb 02, 2025 06:25 PM IST

IND vs ENG T20 Scorecard : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा लाईव्ह स्कोअर येथे पाहू शकता.

IND vs ENG Live Score : भारताची वादळी सुरुवात, अभिषेक शर्माचे ३७ चेंडूत शतक
IND vs ENG Live Score : भारताची वादळी सुरुवात, अभिषेक शर्माचे ३७ चेंडूत शतक (BCCI - X)

India vs England 5th T20 Score : टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेवर कब्जा केला आहे. भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली.

मुंबईत प्रथम फलंदाजी करताना भारताने २४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०.३ षटकात अवघ्या ९७ धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून अभिषेक शर्माने १३५ धावांची खेळी केली. त्याने २ विकेट्सही घेतल्या. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले.

या मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेटने जिंकला होता. यानंतर दुसरा सामना २ गडी राखून जिंकला. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत २६ धावांनी विजय मिळवला. पण भारताने पुन्हा सलग दोन सामने जिंकले आणि  मालिका जिंकली.

भारत वि. इंग्लंड क्रिकेट स्कोअर

भारताने इंग्लंडला दिले २४८ धावांचे लक्ष्य 

भारताने इंग्लंडला विजयासाठी २४८ धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या. यादरम्यान अभिषेक शर्माने धमाकेदार शतक झळकावले.

यादरम्यान अभिषेक शर्माने धमाकेदार शतक झळकावले. अभिषेक शर्माने ५४ चेंडूंचा सामना करत १३५ धावा केल्या. त्याने १३ षटकार आणि ७ चौकार मारले. शिवम दुबेने १३ चेंडूत ३० धावा केल्या. तिलक वर्माने २४ धावांची खेळी केली. संजू सॅमसनने १६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव २ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या ९ धावा करून बाद झाला.

इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात ३८ धावा दिल्या. मार्क वुडने २ बळी घेतले. जेमी ओव्हरटन संघासाठी सर्वात महागडा ठरला. त्याने ३ षटकात ४८ धावा देत १ बळी घेतला. जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांना १-१ बळी मिळाला.

भारताने १९ षटकांत २४० धावा केल्या

भारताने १९ षटकांत ७ गडी गमावून २४० धावा केल्या आहेत. अक्षर पटेल ८ धावा करून खेळत आहे. मोहम्मद शमीला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.

अभिषेक शर्मा बाद

अभिषेक शर्मा १३५ धावा करून बाद झाला. त्यांनी इतिहास रचला आहे. अभिषेकने भारताकडून फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली.

अभिषेकने ५४ चेंडूंचा सामना करत १३५ धावा केल्या आहेत. त्याने १३ षटकार आणि ७ चौकार मारले आहेत.

भारताने १८ षटकांत ७ गडी गमावून २३७ धावा केल्या आहेत.

टीम इंडियाला सहावा धक्का, रिंकू बाद

टीम इंडियाच्या धावसंख्येने २०० धावा पार केल्या आहेत. पण सहावी विकेटही पडली. रिंकू सिंग ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले.

भारताने १६ षटकांत ६ गडी गमावून २०२ धावा केल्या आहेत. आता अक्षर पटेल फलंदाजीला आला आहे.

भारताला चौथा धक्का 

भारताची चौथी विकेट शिवम दुबेच्या रूपाने पडली. १३ चेंडूत ३० धावा करून तो बाद झाला. कार्सने शिवम दुबेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अभिषेक शर्माचे ३७ चेंडूत शतक

अभिषेक शर्माने धमाकेदार कामगिरी करत शतक झळकावले. त्याने अवघ्या ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत अभिषेकने १० षटकार आणि ५ चौकार मारले आहेत. भारताने १४५ धावा केल्या आहेत.

टीम इंडियाला तिसरा झटका, सूर्या बाद

भारताची तिसरी विकेट कर्णधार सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. ३ चेंडूत २ धावा करून तो बाद झाला. कार्सने सूर्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

भारताने ११ षटकात ३ गडी गमावून १४८ धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्माचे १७ चेंडूत अर्धशतक

अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी करताना भारतासाठी झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने १७ चेंडूत अर्धशतक केले. या खेळीत अभिषेकने ५ षटकार आणि ३ चौकार लगावले.

टीम इंडियाला पहिला धक्का

टीम इंडियाला पहिला धक्का बसला. संजू सॅमसन १६ धावा करून बाद झाला. मार्क वुडने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता तिलक वर्मा फलंदाजीला आले आहेत.

अभिषेक शर्मा ५ धावा करून खेळत आहे. भारताने २ षटकात १ गडी गमावून २१ धावा केल्या आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन- फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रीडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्री आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

भारताची प्रथम फलंदाजी

इंग्लंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये मार्क वुड परतला आहे. साकिब महमूदच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.

सूर्या फॉर्मात येण्याचा प्रयत्न करणार

जगातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सूर्यकुमार यादव ८ महिन्यांपूर्वी बांगलादेशविरुद्ध ७५ धावा केल्यापासून एकही चांगली खेळी खेळू शकलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय कर्णधाराला आपले खातेही उघडता आलेले नाही, तर अन्य दोन सामन्यांमध्ये त्याने १२ आणि १४ धावा केल्या.

संजू सॅमसन शॉर्ट बॉलवर बाद होतोय

भारतीय संघासाठी आता अव्वल फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी दाखवण्याची गरज आहे. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याच्या बॅटने फार काही केले नाही. मात्र, सॅमसन आणि सूर्यकुमारचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

सॅमसनने आतापर्यंत ४ सामन्यांत केवळ ३५ धावा केल्या आहेत, पण भारत त्याच्या सलामीच्या जोडीच्या संयोजनात काही बदल करेल असे वाटत नाही. सॅमसन या मालिकेपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळला नव्हता आणि सामन्याच्या सरावाचा अभाव त्याच्या खेळात स्पष्टपणे दिसून येतो. मार्क वुड आणि जोफ्रा आर्चरच्या वेगवान आणि शॉर्ट चेंडूंविरुद्ध तो संघर्ष करताना दिसत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या