India vs England 3rd T20 Highlights : राजकोट टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा २६ धावांनी पराभव केला. निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार कामगिरी केली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४५ धावा करू शकला. भारताकडून हार्दिक पांड्याने ४० धावांची खेळी केली. तर वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले.
या विजयासह इंग्लंडने मालिकेत चांगले पुनरागमन केले आहे. तरीही ते मालिकेत २-१ ने मागे आहेत.
भारताची दुसरी विकेट अभिषेक शर्माच्या रूपाने पडली. १४ चेंडूत २४ धावा करून तो बाद झाला. अभिषेक ५ चौकार मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ब्रायंड कार्सने बाद केले.
भारताला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या आहेत. वरुण चक्रवर्तीने टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट घेतल्या.
इंग्लंडकडून बेन डकेटने अर्धशतक झळकावले. त्याने २८ चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार मारले. लिव्हिंगस्टनने ४३ धावा केल्या. जोस बटलरने २४ धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले. त्याने ४ षटकात २४ धावा दिल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या आहेत. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी १-१ बळी घेतला.
हार्दिक पांड्याने या सामन्यातील दुसरी विकेट घेतली. त्याने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. पांड्याने लिव्हिंगस्टनला बाद केले. लिव्हिंगस्टन २४ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला.
इंग्लंडने १७.१ षटकात ९ गडी गमावून १४७ धावा केल्या आहेत.
वरुण चक्रवर्तीने राजकोट टी-२० सामन्यात पाचवी विकेट घेतली. इंग्लंडच्या डावातील १६व्या षटकात त्याने २ बळी घेतले. चौथ्या चेंडूवर वरुणने कार्सला बाद केले. यानंतर जोफ्रा आर्चर बाद झाला. इंग्लंडने १६ षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टन २४ धावा करून खेळत आहे. आता आदिल रशीद फलंदाजीला आला.
वरुण चक्रवर्तीने सलग दुसरी विकेट घेतली. त्याने १४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेमी स्मिथला बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर ओव्हरटनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्मिथ झेलबाद तर ओव्हरटन बोल्ड झाला.
इंग्लंडने १३.४ षटकांत ६ गडी गमावून ११५ धावा केल्या आहेत.
इंग्लंडला चौथा धक्का बसला आहे. हॅरी ब्रूक ८ धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लिव्हिंगस्टन १४ धावा करून संघाकडून खेळत आहे.
इंग्लंडने १२.४ षटकांत ४ गडी गमावून १०८ धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या धावसंख्येने १०० धावा ओलांडल्या आहेत. संघाने १२ षटकांत ३ गडी गमावून १०१ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक ७ धावा करून खेळत आहे. लिव्हिंगस्टन ९ धावा करून खेळत आहे. भारताकडून हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. अक्षर पटेलला मोठे यश मिळाले आहे. बेन डकेट अर्धशतकानंतर बाद झाला. तो २८ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला.
इंग्लंडने १० षटकांत ३ गडी गमावून ८७ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक २ धावा करून खेळत आहे. लियाम लिव्हिंगस्टोन मैदानात आला आहे.
वरुण चक्रवर्तीने भारताला मोठी विकेट दिली. जोस बटलर २२ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले होते. पण भारताने डीआरएस घेतला. यामध्ये त्याला बाद घोषित करण्यात आले.
इंग्लंडने ९ षटकांत २ गडी गमावून ८३ धावा केल्या आहेत. बेन डकेट ४९ धावा करून खेळत आहे.
इंग्लंडने ८ षटकात १ गडी गमावून ७४ धावा केल्या आहेत. बटलर १९ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे. २२ चेंडूत ४२ धावा करून डकेट खेळत आहे. या दोघांमध्ये ६७ धावांची भागीदारी झाली आहे. टीम इंडियाचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत.
इंग्लंडची धावसंख्या ५० धावांच्या जवळ पोहोचली आहे. बेन डकेटने स्फोटक फलंदाजी केली आहे. तो १४ चेंडूत ३८ धावांवर खेळत आहे. डकेटने ६ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. बटलर ६ धावा करून खेळत आहे.
इंग्लंडने 5 षटकांत 1 गडी गमावून 49 धावा केल्या आहेत.
हार्दिक पंड्याने दुसऱ्याच षटकात फिल सॉल्टची शिकार केली. पंड्याने येताच चमत्कार केला आणि त्याने फिलिप सॉल्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॉल्ट अवघ्या ५ धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने सॉल्टचा झेल घेतला.
फिल सॉल्ट आणि बेन डकेट इंग्लंडकडून सलामीला आले आहेत. टीम इंडियाने पहिली ओव्हर मोहम्मद शमीकडे सोपवली आहे. शमी बऱ्याच दिवसांनी परतला आहे.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पुन्हा एकदा प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आहे. टीम इंडियाने मोहम्मद शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. अर्शदीप सिंग प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे.
भारताने सलग दोन सामने जिंकून ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आता आजचा सामना जिंकून मालिका काबीज करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष आहे.
संबंधित बातम्या