India vs England 2nd T20 Highlights : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. यानंतर आज दुसरा टी-20 सामना चेन्नईत झाला, या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या षटकात विजय मिळवला.
भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी ६ धावांची गरज होती, पण तिलक वर्माने दोन चेंडूतच संघाला विजय मिळवून दिला.
भारताने इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव केला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तिलक वर्मा, ज्यांनी ७२ धावांची नाबाद खेळी केली.
टीम इंडियाने मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९.२ षटकांत ८ गडी गमावून लक्ष्य गाठले.
टीम इंडियाची तिसरी विकेट कर्णधार सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. ७ चेंडूत १२ धावा करून तो बाद झाला. सूर्याला कार्सने बाद केले. तिलक वर्मा २६ धावा करून खेळत आहे. ध्रुव जुरेल १ धावांवर खेळत आहे.
भारताने ६ षटकात ३ गडी गमावून ५९ धावा केल्या आहेत.
टीम इंडियाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे गेली आहे. त्यांनी ५ षटकात ५१ धावा केल्या आहेत. टिळक वर्मा १९ धावा करून खेळत आहे. सूर्यकुमार यादव १२ धावा करून खेळत आहे.
भारताची पहिली विकेट पडली. अभिषेक शर्मा LBW आऊट झाला. मार्क वुडने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता तिलक वर्मा फलंदाजीला आले आहेत. सॅमसन २ धावा करून खेळत आहे.
इंग्लंडने भारताला विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य दिले आहे. बटलरने संघासाठी ४५ धावांची खेळी केली. ब्रायडन कार्सने ३१ धावांचे योगदान दिले. जेमी स्मिथने २२ धावा केल्या.
या सामन्यात टीम इंडियाने ७ गोलंदाजांचा वापर केला. त्यात पाच फिरकीपटू होते. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ बळी घेतले. अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
इंग्लंडची नववी विकेट पडली. हार्दिक पांड्याने आदिल रशीदला बाद केले. तो १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात पांड्याची ही पहिली विकेट होती.
इंग्लंडने १९ षटकांत ९ गडी गमावून १५७ धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर ९ धावा करून खेळत आहे. आता मार्क वुड फलंदाजीला आला आहे.
अभिषेक शर्माने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. त्याने जेमी स्मिथला बाद केले आहे. इंग्लंडने १२.३ षटकात ६ गडी गमावून १०४ धावा केल्या आहेत. आता ब्रायडन कार्स फलंदाजीला आला आहे.
अक्षर पटेलने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. बटलर ४५ धावा करून बाद झाला. त्याचे अर्धशतक हुकले आहे. अक्षर पटेलने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
इंग्लंडने ९.३ षटकात ४ गडी गमावून ७७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडची तिसरी विकेट पडली. वरुण चक्रवर्तीने हॅरी ब्रुकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. १३ धावा करून ब्रुक आऊट झाला.
इंग्लंडने ६.३ षटकांत ३ गडी गमावून ५९ धावा केल्या आहेत. बटलर ३८ धावा करून खेळत आहे. त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले आहेत.
भारताने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. बेन डकेट ३ धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
इंग्लंडने ३.१ षटकात २ गडी गमावून २६ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात यश मिळवून दिले. सॉल्टने अर्शदीपला चौकार मारून सुरुवात केली, पण या षटकात अर्शदीपने त्याची शिकार केली. सॉल्टने तीन चेंडूत ४ धावा केल्या. अर्शदीपची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही ९८वी विकेट आहे.
इंग्लंडने पहिल्या षटकाच्या ४ चेंडूत ६ धावा केल्या आणि १ विकेट गमावली.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन- बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड
या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या जागी ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टनचा समावेश करण्यात आला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. रिंकू सिंग बाहेर आहे.
अष्टपैलू शिवम दुबे इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होणार असून तो दुखापत झालेल्या नितीश कुमार रेड्डीची जागा घेणार आहे.
त्याचबरोबर रिंकू सिंग दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यातही खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी रमणदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी ही माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या