Ind vs Eng : ख्रिस गेलचा 'तो' विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला हव्या फक्त २९३ धावा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng : ख्रिस गेलचा 'तो' विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला हव्या फक्त २९३ धावा

Ind vs Eng : ख्रिस गेलचा 'तो' विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला हव्या फक्त २९३ धावा

Feb 05, 2025 12:14 PM IST

Virat Kohli Chasing Chris Gayle Record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली एका नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यासाठी त्याला केवळ २९३ धावांची गरज आहे.

Ind vs Eng : ख्रिस गेलचा 'तो' विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला हव्या फक्त २९३ धावा
Ind vs Eng : ख्रिस गेलचा 'तो' विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला हव्या फक्त २९३ धावा

Virat Kohli Record against England : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदिवसीय सामना खेळणार आहे. कसोटीमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विराटला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून टीकाकारांना बॅटनं उत्तर देण्याची संधी आहे. इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याला खुणावतो आहे. ख्रिस गेलचा हा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त २९३ धावांची गरज आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर सतत बाद होणाऱ्या कोहलीला वनडेतही याच समस्येला सामोरं जावं लागू शकतं. मात्र, कोहली लवकरच फॉर्ममध्ये परतेल, अशी चाहत्यांना आशा आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तो फॉर्म पुन्हा मिळवू शकतो.

विराट कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत आतापर्यंत १३४० धावा केल्या आहेत. आगामी वनडे मालिकेत त्यानं २९३ धावा केल्यास तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. विराट कोहली वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेललाही मागे टाकेल. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराट १९५ धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो भारत विरुद्ध इंग्लंड वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल. एमएस धोनीच्या नावावर हा विक्रम आहे. त्यानं १५४६ धावा केल्या आहेत.

रणजीमध्येही केली निराशा

विराट कोहलीनं नुकतंच १३ वर्षांनंतर रणजी करंडकात पुनरागमन केलं आणि सामनाही खेळला. मात्र, रेल्वेविरुद्धच्या सामन्यात त्याला कमाल दाखवता आली नाही. पहिल्या डावात केवळ १५ चेंडू खेळून तो सहा धावा करून बाद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी भारताला इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. हे तीन एकदिवसीय सामने नागपूर, अहमदाबाद आणि कटक इथं खेळवले जातील. या खेळपट्ट्या मोठ्या धावसंख्येसाठी ओळखल्या जातात.

इंग्लंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा

ख्रिस गेल - १६३२

कुमार संगकारा - १६२५

सर विवियन रिचर्ड्स - १६१९

रिकी पाँटिंग - १५९८

महेला जयवर्धने - १५६२

एमएस धोनी - १५४६

युवराज सिंग - १५२३

सचिन तेंडुलकर - १४५५

मायकेल क्लार्क - १४३०

रॉस टेलर - १४२४

आरोन फिंच - १३५४

विराट कोहली - १३४०

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग