India vs England Score, T20 World Cup 2024 Semi Final: टी २० क्रिकेट विश्वचक्षकांच्या अंतिमपुर्व सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत इंग्लंडच्या संघाचा ६८ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची धडाकेबाज फलंदाजी आणि अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्या फिरकीमुळे इंग्लंडच्या संघाचे कंबरडे मोडले. जोस बटलर आणि हॅरी ब्रुक वगळता एकही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. अक्षर पटेल व कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंनी भारताच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. तर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी भागीदारी टिकवत चांगले लक्ष्य इंग्लंडच्या संघापुढे उभे केले. त्यामुळे भारतीय संघाचा विजय शक्य झाला. या विजयासह भारताने १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
टीम इंडियाने आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एकतर्फी सामन्यात ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. टी २० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाले. या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ का म्हटले जात आहे हे टीम इंडियाने पुन्हा एकदा सिद्ध केले. भारतीय संघ एकजुटीने खेळत या इंग्लंड विरोधातील या विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यावर भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. यानंतर टीम इंडियाने २० षटकात ७ विकेट गमावत १७१ धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०३ धावांवर ऑलआऊट झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि अक्षर पटेलसह सहा खेळाडू टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयाचे हिरो ठरले.
रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्माने सुरवातीपासून आक्रमक खेळी करत धावांचा डोंगर उभा करण्यास सुरुवात केली. तर विराट कोहली याने टॉप्ली याला षटकार मारल्या नंतर पुन्हा एक जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात ९ धावा काढून तंबूत परतला. तर रिषभ पंत देखील केवळ ४ धावा काढून बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. या दोघांनी मोठी भागिदारी केली. रोहित शर्माने ५७ धावा तर सूर्यकुमार यादवने ४७ धावा काढल्या. हार्दिक पांड्याने २३ धावा करत भारतीय धावफलक वाढवला. शिवम दुबे शून्यावर तर रवींद्र जडेजाने १७ आणि अक्षर पटेलने १० धावा केल्या. भारताने इंग्लंड संघापुढे १७२ धावांचे लक्ष्य ठेवले. तर इंग्लंडकडून जॉर्डनने ३ विकेट घेतल्या.
भारताने गोलंदाजीला सुरूवाट केली. तेव्हा बटलरने चांगली सुरुवात करत अर्शदीपच्या तिसऱ्या षटकात ३ चौकार मारले. यामुळे भारतीय गोलंदाजांवरील दबाव वाढवण्याचा त्याने प्रयत्न केला. यावेळी गोलंदाजीत थोडा बदल करत रोहित शर्माने फिरकीपटू अक्षर पटेल याला चौथे षटक टाकायला लावले. अक्षरच्या पहिल्याच चेंडूवर बटलरला बाद झाला. तर बुमराहने पुढच्या षटकात फिल सॉल्टला बोल्ड करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. ६ व्या षटकात अक्षर पटेलने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद केले. यानंतर मोईन अली यष्टीचीत बाद झाला. कुलदीप यादवने सॅम करनची विकेट घेतली. यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला. तर हॅरी ब्रुकची विकेट कुलदीप यादवने घेतली ख्रिस जॉर्डनला देखील कुलदीपने १ रनवर बाद केले. तर तर इंग्लंडचे दोन खेळाडू रणआउट झाले. जसप्रीत बुमरहाने इंग्लंडची शेवटची विकेट घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
कर्णधार रोहित शर्माने कर्णधार पडला साजेशी खेळी केली. विराट कोहली आऊट झाल्यावर रोहित शर्माने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत ३९ चेंडूत ५७ धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. रोहितची ही खेळीही खास ठरली कारण गयानामधील प्रॉव्हिडन्स स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल नव्हती. रोहितने ५७ धावा कडून रचलेल्या पायाचा भारताला फायदा झाला.
विराट कोहली आणि ऋषभ पंत हे दोघेही ४० धावफलक असताना बाद झाले होते. यामुळे टीम इंडियावर मोठी धाव संख्या उभारण्याचा दबाव दिसून येत होता. कर्णधार रोहितसोबत फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले.
पंड्याने छोटी पण प्रभावी खेळी खेळली आणि या जोरावरच टीम इंडियाला १७० धावांचा टप्पा ओलांडता आला. हार्दिकने १३ चेंडूत २३ धावा केल्या. ज्यात जॉर्डनच्या चेंडूवर लागोपाठ दोन षटकारांचा समावेश होता.
पटेलने फलंदाजी करताना सहा चेंडूत १० धावा केल्या आणि गोलंदाजीत तीन बळी घेतले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर चांगलाच संपर्कात असल्याचे दिसत होते, पण तो गोलंदाजीला येताच अक्षरने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. अक्षरने मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो यांची विकेट्सही घेतली.
बुमराहने फिल सॉल्टची विकेट घेतली आणि ही विकेट खूप महत्त्वाची होती. फिल सॉल्ट हा अतिशय धोकादायक फलंदाज आहे, पण बुमराहने त्याला स्थिरावण्याची संधी दिली नाही. सॉल्टच्या विकेटने इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले होते.
कुलदीप यादव साखळी फेरीत एकही सामना खेळला नाही, पण सुपर-8 साठी टीम इंडिया कॅरेबियन भूमीवर पोहोचताच कुलदीप यादव टीम इंडियासाठी मोठा गेम चेंजर ठरला आहे. कुलदीपने चार षटकांत केवळ १९ धावा देत तीन बळी घेतले. कुलदीपने हॅरी ब्रूक्स, सॅम करन आणि ख्रिस जॉर्डन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.