टी-20 विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत (२७ जून) भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंड यांच्यात झाला. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवला.
कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीनंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी (२९ जून) विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
विशेष म्हणजे भारताने १० वर्षानंतर टी-20 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी भारताचा २०१४ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला होता.
आता भारतीय संघ तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. यापूर्वी २००७ आणि २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने २००७ मध्ये जेतेपद पटकावले होते, तर २०१४ मध्ये ते विजेतेपदाला मुकले होते.
रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला.
भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत ३ बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्यामुळे भारताने स्पर्धेतील विजयी मोहीम सुरू ठेवली. आता अंतिम फेरीत त्यांचा सामना अशा संघाशी होईल जो पहिल्यांदाच विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे.
१३ षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या ७ विकेटवर ७३ धावा आहे. लियाम लिव्हिंगस्टोन १२ चेंडूत ६ धावांवर खेळत आहे. तर जोफ्रा आर्चर दोन चेंडूत एका धावेवर आहे. इंग्लंडला आता ४२ चेंडूत विजयासाठी ९९ धावांची गरज आहे. सामना आता पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे.
११व्या षटकात हॅरी ब्रूकने आधी दुहेरी आणि नंतर चौकार मारला. मात्र, तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने त्याला बोल्ड केले. रिव्हर्स स्वीप खेळताना ब्रूक बाद झाला. ब्रूकने १९ चेंडूत २५ धावा केल्या. इंग्लंडने ६८ धावांत ६ विकेट गमावल्या आहेत.
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अक्षर पटेलने इंग्लंडला पहिला धक्का दिला. तुफानी फलंदाजी करणारा जोस बटलर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. बटलरने १५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. आता मोईन अली फलंदाजीसाठी आला आहे.
भारताने इंग्लंडसमोर १७२ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५७ धावा केल्या. रोहितच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. तर सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकार आले. शेवटी रवींद्र जडेजा ९ चेंडूत १७ धावा काढून नाबाद परतला.
इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ बळी घेतले. मात्र, भारतीय डावाच्या १८व्या षटकात जॉर्डनची हॅटट्रिक हुकली. त्याने सलग दोन चेंडूंवर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना बाद केले होते. जॉर्डनने या टी-20 विश्वचषकात आधीच एक हॅट्ट्रिक घेतली आहे.
१९व्या षटकात रविंद्र जडेजाने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारले. सध्या अक्षर पटेल जडेजासोबत क्रीजवर आहे. या षटकात एकूण १२ धावा आल्या. भारताच्या ६ बाद १५९ धावा झाल्या आहेत.
हार्दिक पंड्या १३ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. त्याआधी त्याने ख्रिस जॉर्डनला सलग दोन षटकार ठोकले. तिसरा षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला.
भारतीय संघाला तिसरा धक्का १४व्या षटकात ११३ धावांवर बसला. रोहित शर्मा ३९ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. रोहितला आदिल रशीदने बोल्ड केले. आता हार्दिक पांड्या आला आहे. १४ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ विकेटवर ११३ धावा आहे.
१३वे षटक भारतासाठी उत्कृष्ट ठरले. सॅम करनच्या या षटकात रोहित शर्माने एक षटकार ठोकला. तर सूर्यकुमारनेही एक षटकार आणि १ चौकार मारला. षटकात एकूण १९ धावा आल्या. रोहित शर्माने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १३ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या २ विकेटवर ११० धावा आहे. रोहित ५६ आणि सूर्यकुमार ३९ धावांवर खेळत आहेत. भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने ११व्या षटकात गगनचुंबी षटकार ठोकला. हिटमॅन ३३ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४८ धावांवर खेळत आहे. तर सूर्यकुमार यादव १९ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकारासह २३ धावांवर खेळत आहे. ११ षटकांत भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावा आहे.
पावसाच्या व्यत्ययानंतर सामनासुरू झाला आहे. खेळ सुरू झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा आक्रमक फॉर्म कायम आहे.
पावसामुळे खेळ थांबला आहे. आतापर्यंत ८ षटके खेळली गेली आहेत. भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ६५ धावा आहे. रोहित शर्मा २६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३७ धावांवर खेळत आहे. तर सूर्यकुमार यादव ७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १३ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये १६ चेंडूत २५ धावांची भागीदारी आहे.
पॉवरप्लेमध्ये कर्णधार रोहित शर्माचा आक्रमक फॉर्म कायम आहे. रोहितने सातव्या षटकात आदिल रशीदवर दोन चौकार मारले. हिटमॅन आता २३ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३५ धावांवर आहे. ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ६४ धावा आहे.
रोहित शर्माने जोफ्रा आर्चरने टाकलेल्या चौथ्या षटकात ८ धावा वसूल केल्या. सध्या रोहित शर्मा आणि ऋषभ पंत क्रीजवर आहेत. भारतच्या ४ षटकात १ बाद ३० धावा झाल्या आहेत.
टीम इंडियाची पहिली विकेट तिसऱ्या षटकात १९ धावांवर पडली. विराट कोहली एका षटकाराच्या मदतीने ९ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. कोहलीला रीस टोपलीने बोल्ड केले. T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच कोहलीने ५० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
२ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न पडता ११ धावा आहे. रोहित शर्मा सात चेंडूत ९ धावांवर खेळत आहे. तर विराट कोहली ५ चेंडूत एका धावेवर आहे. जोफ्रा आर्चरने दुसऱ्या षटकात ५ धावा दिल्या.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार बटलरने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी समालोचक रवी शास्त्री यांनी भारतीय कर्णधार रोहितला विचारले की, नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने काय निर्णय घेतला असेल? यावर रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे सांगितले.
गयानामध्ये सध्या पाऊस पडत नाही. खेळाडू मैदानावर वार्मअप करत आहेत. मात्र खराब आउटफिल्डमुळे या सामन्याचा नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही. मैदानावर अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अशा स्थितीत सध्या नाणेफेक होणे फार कठीण दिसत आहे.
ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला विलंब होत आहे. गयानामध्ये सध्या पाऊस पडत नाही. मात्र, ढगाळ वातावरण आहे. भारत आणि इंग्लंडचे खेळाडू आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये आहेत. पंचांनी भारतीय कर्णधाराशीही चर्चा केली. सध्या मैदानावर पाणी असून नाणेफेक होण्यास विलंब होत आहे. पंच पुन्हा मैदानाची पाहणी करून वेळेत निर्णय घेतील. मैदानावर अजूनही कव्हर्स आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने त्याच्या X खात्यावर पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की, सध्या परिस्थिती फारशी चांगली नाही. आम्ही वाटेत असताना मुसळधार पाऊस पडला आणि आता रिमझिम पाऊस पडत आहे. पण चांगली बातमी अशी आहे की सूर्य बाहेर डोकावत आहे'.
टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २३ वेळा भिडले आहेत, ज्यात भारताचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने १२ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी ४ वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत.
टी-20 विश्वचषक २०२२ मध्ये, इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. जॉस बटलर याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने चमकदार कामगिरी करत भारताला दणका दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते जे इंग्लंडने १६ षटकांत पूर्ण केले. भारतीय संघ सध्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे.
भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे आणि ग्रुप स्टेजनंतर त्यांनी सुपर ८ मध्येही अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, इंग्लंडने अमेरिकेचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. याआधीही २०२२ मध्ये दोन्ही संघ अंतिम ४ मध्ये आमनेसामने आले होते जिथे इंग्लंड संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला होता.