मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Dream 11 : भारत-इंग्लंड सेमी फायनल रंगणार, ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

IND vs ENG Dream 11 : भारत-इंग्लंड सेमी फायनल रंगणार, ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Jun 27, 2024 11:30 AM IST

IND vs AUS Dream 11 Team Prediction : या T20 विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताने गट स्टेजमधील सर्व सामने जिंकून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.

IND vs ENG Dream 11 : भारत-इंग्लंड सेमी फायनल रंगणार, ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
IND vs ENG Dream 11 : भारत-इंग्लंड सेमी फायनल रंगणार, ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची परफेक्ट टीम (AFP)

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा दुसरा सेमी फायनल सामना आज (२७ जून) भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना गुरुवारी (२७ जून) भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

या T20 विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताने गट स्टेजमधील सर्व सामने जिंकून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.

यानंतर, सुपर ८ फेरीत, भारतीय संघाने आपले तिन्ही सामने चमकदारपणे जिंकले आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

दुसरीकडे, इंग्लंडसाठी हा T20 विश्वचषक थोडा चढ-उताराचा ठरला आहे, ज्यामध्ये संघाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, भारत असो की इंग्लंड, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

४ फलंदाज आणि ३ अष्टपैलू खेळाडूंना स्थान द्या

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यासाठी तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात जोस बटलर आणि ऋषभ पंत यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करू शकता. बटलर आणि पंत या दोघांनीही या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

प्रमुख फलंदाजांमध्ये तुम्ही ४ खेळाडूंचा समावेश करू शकता, ज्यामध्ये तुम्ही रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि हॅरी ब्रूक यांचा समावेश करू शकता.

रोहित, ब्रुक आणि सूर्या चांगल्या फॉर्मात आहेत. तर उपांत्य फेरीच्या सामन्याचा विचार करता विराट कोहलीकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा केली जाऊ शकते.

तसेच, तुमच्या ड्रीम इलेव्हन टीममध्ये तुम्ही हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि मोईन अली यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समाविष्ट करू शकता. हे तिघेही सामना फिरवणारे खेळाडू आहेत, ज्यामध्ये हार्दिकने बॅट तसेच चेंडूने उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे, तर अक्षर पटेल देखील अशाच भूमिकेत दिसला आहे.

गयानाची खेळपट्टी पाहता मोईन अलीही फिरकीने चमत्कार करू शकतो. यानंतर गोलंदाजीत तुम्ही जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवला तुमच्या संघात समाविष्ट करू शकता.

कोहली कर्णधार, कुलदीपला उपकर्णधार

या सामन्यासाठी तुम्ही विराट कोहलीला तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात कर्णधार बनवू शकता. तो फॉर्मात नाही पण, सेमी फायनल आणि इंग्लंडविरुद्धचा त्याचा रेकॉर्ड लक्षात घेऊन तो या सामन्यात मोठी खेळी खेळू शकतो.

याशिवाय, तुम्ही कुलदीप यादवची उपकर्णधार म्हणून निवड करू शकता. कुलदीपने सुपर ८ फेरीत शानदार गोलंदाजी केली आहे.

IND vs Eng Dream 11 Team Prediction

यष्टिरक्षक - जोस बटलर, ऋषभ पंत.

फलंदाज – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हॅरी ब्रूक.

अष्टपैलू - हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोईन अली.

गोलंदाज - कुलदीप यादव (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह.

WhatsApp channel