India vs England: रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वादळी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: रोहित शर्मा वनडेत ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, त्याचा संघाला खूप फायदा होत आहे. वेळोवेळी शुभमन गिलही त्याला साथ देत वेगवान धावा करताना दिसत आहे. अशाप्रकारे रोहित शर्माने शुभमन गिलसोबत मिळून एक आश्चर्यकारक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित-गिलची जोडी आता वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद भागीदारी करणारी भारतातील पहिली जोडी ठरली आहे.
रोहित शर्मा-गिलने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वादळी फलंदाजीने वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या जोडीचा विक्रमही मोडला आहे. एवढंच नाही तर विराट कोहली आणि सुरेश रैना ची जोडीही या दोघांपेक्षा खूप मागे आहे. एकेकाळी सर्वात धोकादायक सलामीजोडी म्हणून ओळखली जाणारी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरची जोडीही रोहित-गिलच्या वादळी धावगतीपुढे फिकट झाली आहे. रोहित-गिल जोडी वनडे क्रिकेटमध्ये जवळपास 7 च्या रन रेटने धावा करत असताना सेहवाग-गंभीर जोडीचा रनरेट साडेसहा पेक्षा कमी होता.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी एक हजार धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ६.९९ च्या रन रेटने धावा केल्या आहेत. दुसरी जोडी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ची जोडी आहे, जी वनडे क्रिकेटमध्ये ६.४० च्या रन रेटने धावा करत होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि सुरेश रैना आहेत, ज्यांनी मिळून ६.३३ च्या रन रेटने धावा केल्या आहेत. वीरू-सचिन जोडी चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवाग-सचिनने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी जोडी म्हणून ६.१३ धावा प्रति षटक या दराने धावा केल्या.
१) रोहित शर्मा/शुभमन गिल*- ६.९९ सरासरी
२)वीरेंद्र सेहवाग/गौतम गंभीर- ६.४० सरासरी
३) विराट कोहली/सुरेश रैना- ६.३३ सरासरी
४) वीरेंद्र सेहवाग/सचिन तेंडुलकर- ६.१३ सरासरी
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या खेळला जाणार आहे, जो फक्त औपचारिक म्हणून खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही देशांत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
संबंधित बातम्या