India Vs Englnd Live Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला.
या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने १२.५ षटकांत लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने ७९ धावांची अप्रतिम खेळी केली.
याआधी वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्याने २-२ बळी घेतले.
इंग्लंडविरुद्धच्या या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अभिषेक शर्मा ७९ धावा करून बाद झाला. त्याने ३४ चेंडूत ७९ धावांची खेळी खेळली. आदिल रशीदने अभिषेकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारताला विजयासाठी ६ धावांची गरज आहे.
अभिषेक शर्माने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करून खेळत आहे.
भारताची दुसरी विकेट सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. त्याला खातेही उघडता आले नाही. आर्चरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता तिलक वर्मा फलंदाजीला आले आहेत. अभिषेक शर्मा १० धावा करून खेळत आहे.
भारताने ५ षटकात २ गडी गमावून ४५ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने भारताला मोठा धक्का दिला आहे. संजू सॅमसन २० चेंडूत २६ धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे.
भारताने 4.2 षटकात 1 गडी गमावून 41 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसनने भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली आहे. डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने २२ धावा दिल्या. सॅमसन १२ चेंडूत २३ धावा करून खेळत आहे. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला आहे.
इंग्लंडचे दुसरे षटक ॲटकिन्सनने टाकले. त्याने एकूण २२ धावा दिल्या.
इंग्लंडने भारताला विजयासाठी १३३ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाकडून जोस बटलरने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. हॅरी ब्रूकने १७ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. आर्चर १२ धावा करून बाद झाला.
आदिल रशीद ८ धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे २० षटकांत १३२ धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.
भारताकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. चक्रवर्तीने ४ षटकात २३ धावा देत ३ बळी घेतले. अर्शदीप आणि अक्षर पटेलने २-२बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही २ बळी घेतले.
इंग्लंडचा संघ ऑलआऊट होण्याच्या जवळ आहे. कर्णधार जोस बटलर ६८ धावा करून बाद झाला. त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. वरुण चक्रवर्तीने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
वरुण चक्रवर्ती याने एकाच षटकात दोन बळी घेतले आहेत. ब्रूकनंतर लिव्हिंगस्टोनही बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही.
इंग्लंडने ८ षटकांत ४ गडी गमावून ६५ धावा केल्या आहेत. जोस बटलर ४२ धावा करून खेळत आहे. बेथेलला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
इंग्लंडची तिसरी विकेट पडली. हॅरी ब्रूक १७ धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडने ७.४ षटकात ३ गडी गमावून ६५ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने ६ षटकांत २ गडी गमावून ४६ धावा केल्या आहेत. जोस बटलर ३४ धावा करून खेळत आहे. हॅरी ब्रूक ६ धावा करून खेळत आहे. पांड्या भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात महागडा ठरला आहे. त्याने २ षटकात २७ धावा दिल्या आहेत.
इंग्लंडची दुसरी विकेट पडली. फिलिप सॉल्टनंतर बेन डकेटही बाद झाला. ४ धावा करून तो बाद झाला. अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीपची ही दुसरी विकेट होती. आता हॅरी ब्रूक फलंदाजीसाठी मैदानात पोहोचला आहे. इंग्लंडने ३ षटकात २ गडी गमावून १७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फिल सॉल्ट शून्यावर बाद झाला. अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आता फलंदाजीला आला आहे.
भारत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेईंग-११ मध्ये समावेश होईल असे मानले जात होते, मात्र या सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
इंग्लंड विरुद्ध कोलकाता टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल.
ईडन गार्डन्सवर इंग्लंड अजिंक्य भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण २४ टी-20 सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान भारताने १३ वेळा विजय मिळवला आहे. इंग्लंडने ११ वेळा विजय मिळवला आहे. मात्र, ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारताला आतापर्यंत इंग्लंडला हरवता आलेले नाही. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले असून, दोन्ही वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात १४ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर नजर असेल.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य आहे, परंतु अनेक वेळा येथे मोठी धावसंख्याही पाहायला मिळाली आहे. खेळपट्टी पाहता टीम इंडिया तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकते. इंग्लंडने आधीच आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. ते ४ वेगवान गोलंदाज आणि एक मुख्य फिरकीपटू घेऊन खेळणार आहेत.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर , ध्रुव जुरेल.
बेन डकेट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, जेकब बेथॉल, लियाम लिव्हिंगस्टोन, जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, आदिल रशीद, ब्रायडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, रेहान अहमद, साकिब महमूद.
संबंधित बातम्या