Jasprit Bumrah, IND vs ENG ODI Series : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याआधी भारतीय संघात मोठा बदल झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला फिटनेसमुळे संघातून वगळले आहे. त्याच्या जागी स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला या महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही खेळायची आहे.
अशा स्थितीत भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असू शकतो. बुमराहला फिटनेस सिद्ध करता आला नाही. अशा परिस्थितीत त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. वरुणचा संघात सरावासाठी समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश होईल, असे वृत्त येत होते.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, 'बूम-बूम' बुमराह या स्पर्धेत खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत बुमराहच्या पाठीच्या स्नायूंना दुखापत झाली होती.
बुमराह स्कॅनसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये(NCA) पोहोचला होता. या दरम्यान, बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या बुमराह वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली काही दिवस बेंगळुरूमध्ये राहणार आहे.
पहिला वनडे- ६ फेब्रुवारी- नागपूर
दुसरा वनडे – ९ फेब्रुवारी – कटक
तिसरा वनडे- १२ फेब्रुवारी- अहमदाबाद
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
संबंधित बातम्या