IND vs ENG 3rd ODI Dream11 Prediction Todays Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज (१२ एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिका जिंकली आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत.
आता टीम इंडियाला ही मालिका ३-० अशी जिंकण्याची संधी आहे. तसेच, आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंच स्ट्रेंथला आजमावण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, आजचा सामना हा भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा शेवटचा सामना आहे. या सामन्यातून आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्लेइंग इलेव्हनचाही अंदाज येईल.
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करू शकतो. केएल राहुलच्या जागी ऋषभ पंत आणि वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादव यांना संधी दिली जाऊ शकते.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करतील. विराट कोहली हा संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे, तो तिसऱ्या नंबरवर खेळेल. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फिरकी गोलंदाजी सांभाळतील, तर हर्षित राणा आणि मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीचा भार सांभाळतील.
दुसरीकडे इंग्लंडसाठी फिल सॉल्ट आणि बेन डकेट सलामीला खेळतील. जो रूट हा फलंदाजीतील महत्त्वाचा भाग असेल. आदिल रशीद फिरकी गोलंदाजी सांभाळतील, तर साकिब महमूद आणि गस ऍटकिन्सन वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील.
आकडेवारीनुसार, वनडे फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण १०९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने ६० सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघाने ४४ सामने जिंकले आहेत.
याशिवाय दोन्ही संघांमधील ३ सामन्यांचा निकाल लागला नाही आणि दोन सामने बरोबरीत राहिले.
यष्टिरक्षक: जोस बटलर, फिल सॉल्ट.
फलंदाज: जो रूट, शुभमन गिल.
अष्टपैलू: रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, हार्दिक पंड्या.
गोलंदाज: आदिल रशीद, वरुण चक्रवर्ती.
कर्णधार: रवींद्र जडेजा.
उपकर्णधार: शुभमन गिल.
यष्टिरक्षक: जोस बटलर.
फलंदाज: रोहित शर्मा, विराट कोहली, बेन डकेट, श्रेयस अय्यर, शुभमन गिल.
अष्टपैलू: रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन.
गोलंदाज: अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
कर्णधार: शुभमन गिल.
उपकर्णधार: रोहित शर्मा.
संबंधित बातम्या