भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (९ फेब्रुवारी) कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने नागपुरात खेळला गेलेला पहिला सामना ४ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
दुखापतीमुळे विराट कोहली त्या सामन्यात खेळला नव्हता. अशा स्थितीत विराट दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये परतणार आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड क्रिकेट संघात आतापर्यंत १०८ सामने खेळले गेले आहेत. तर इंग्लंड क्रिकेट संघाने ४४ सामने जिंकले आहेत. तर २ सामने टाय झाले आणि ३ सामन्यांचा निकाल लागला नाही.
भारतीय भूमीवर आतापर्यंत झालेल्या भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये ५३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, ज्यापैकी भारतीय क्रिकेट संघाने ३५ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा पराभव करण्यात यश मिळवले आहे.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड- फिल सॉल्ट, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, साकिब महमूद, जोफ्रा आर्चर.
यष्टिरक्षक: जोस बटलर, फिल सॉल्ट
फलंदाज: जो रूट, बेन डकेट, श्रेश अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली
अष्टपैलू: रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या
गोलंदाज: अर्शदीप सिंग
कर्णधार: विराट कोहली
उपकर्णधार: अक्षर पटेल
यष्टिरक्षक: जोस बटलर
फलंदाज: जो रूट, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली
अष्टपैलू: रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, जेकब बेथेल
गोलंदाज: हर्षित राणा, जोफ्रा आर्चर,
कर्णधार : रवींद्र जडेजा
उपकर्णधार: अक्षर पटेल
संबंधित बातम्या