भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज रविवारी (२ फेब्रुवारी) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताने या मालिकेत अगोदरच ३-१ अशी अभेद्य आघाडी मिळवली असून आता मालिका ४-१ अशी जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.
पुण्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली. टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा घरच्या मैदानावर हा १७ वा मालिका विजय आहे. २०१९ पासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही टी-20 मालिका गमावलेली नाही.
विशेष म्हणजे, कोणताही संघ अशी कामगिरी करू शकलेला नाही. इतकेच नाही तर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आजपर्यंत एकही मालिका गमावलेली नाही.
या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक पांड्याने सातत्य राखले आहे. याशिवाय अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या बॅटमधूनही धावा झाल्या आहेत. या मालिकेत संजू सॅमसन आणि सूर्याचा फॉर्म दिसला नाही. आता टीम इंडियाने मालिका जिंकल्यामुळे हे दोन्ही फलंदाज वानखेडेवर दबावमुक्त होऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
भारताने गोलंदाजीत विशेषत: फिरकी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. या मालिकेत वरुण चक्रवर्ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत १२ विकेट्स घेतल्या आहेत तर अक्षर पटेल ६ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर बेन डकेट आणि जोस बटलर वगळता आघाडीचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात इंग्लंड विजयासह वनडे मालिका खेळण्यास सज्ज होण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ड्रीम इलेव्हन टीममध्ये फलंदाजीत तुम्ही तिलक वर्मा, अभिषेक वर्मा, जोस बटलर आणि बेन डकेटसारखे फलंदाज निवडू शकता. फिल सॉल्ट याला यष्टिरक्षक म्हणून ठेवता येईल कारण संजू सॅमसन संघर्ष करताना दिसत आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, ब्रेडन कार्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना अष्टपैलू म्हणून ठेवता येईल. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग यांचा समावेश करू शकता.
यष्टिरक्षक- फिल सॉल्ट
फलंदाज- तिलक वर्मा, अभिषेक वर्मा, जोस बटलर आणि बेन डकेट
अष्टपैलू - हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, ब्रेडन कार्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन.
गोलंदाज- वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
कर्णधार- वरुण चक्रवर्ती
उपकर्णधार- जोस बटलर
यष्टिरक्षक- संजू सॅमसन
फलंदाज- जोस बटलर, तिलक वर्मा,
अष्टपैलू - लियाम लिव्हिंगस्टोन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन
गोलंदाज- हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती
कर्णधार- हार्दिक पंड्या
उपकर्णधार- तिलक वर्मा
संबंधित बातम्या