भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज (३१ जानेवारी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नजरा ही मालिका जिंकण्यावर असतील.
भारत सध्या ५ टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी बरोबरीत आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडचा पराभव केला, मात्र त्यानंतर तिसऱ्या सामन्यात जोस बटलर याच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने भारतीय संघाचा पराभव करून दमदार पुनरागमन केले, अशा स्थितीत ही मालिका रोमहर्षक स्थितीत पोहोचली आहे.
टीम इंडियाने पुण्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. आतापर्यंत भारत आणि इंग्लंड पुण्यात फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता. मात्र, आज भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकावी लागण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारतीय चाहत्यांची नजर त्यांचा कर्णधार सूर्यकुमार यादववर असेल. वास्तविक, सूर्यकुमार यादव आत्तापर्यंतच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये वाईटरित्या फ्लॉप ठरला आहे. पण आता महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सूर्यकुमार यादव आज कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या मालिकेत तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांसारख्या युवा खेळाडूंनी आपली छाप नक्कीच सोडली आहे, पण हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या अनुभवी खेळाडूंची कामगिरी निराशाजनक झाली आहे.
यष्टिरक्षक: संजू सॅमसन, जोस बटलर, फिलिप सॉल्ट
फलंदाज: सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा
अष्टपैलू: हार्दिक पांड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन
गोलंदाज: वरुण चक्रवर्ती, ब्रायडन कार्स, मार्क वुड
कर्णधार: तिलक वर्मा
उपकर्णधार: वरूण चक्रवर्ती
भारत: संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती , रवी बिश्नोई.
इंग्लंड : जोस बटलर, जेमी स्मिथ, फिलिप सॉल्ट, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, रेहान अहमद, ब्रायडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, मार्क वुड.
संबंधित बातम्या