India vs England Dream 11 Prediction : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. इंग्लंडसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सामन्यात इंग्लिश संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे.
भारतीय संघाने मागील दोन सामने जिंकले असले तरी चेन्नईत इंग्लंडने कडवी झुंज दिली. भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सामन्यापूर्वी ड्रीम इलेव्हनबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. संघात योग्य खेळाडूंचा समावेश झाला तरच चाहत्यांना त्याचा फायदा होईल. ड्रीम इलेव्हन काही गोष्टी लक्षात घेऊन बनवायला हवे. अष्टपैलूंची संख्या अधिक असावी. जेणेकरून चांगले पॉइंट्स कमावता येतील.
यष्टिरक्षक: जोस बटलर, संजू सॅमसन
फलंदाज: तिलक वर्मा, अभिषेक शर्मा
अष्टपैलू: लियाम लिव्हिंगस्टोन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल
गोलंदाज: जोफ्रा आर्चर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ब्रायडन कार्स
कर्णधार: अभिषेक शर्मा/लिव्हिंगस्टोन जोकास बटलर/संजू सॅमसन
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियममध्ये धावांचा पाऊस पडू शकतो. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. अशा स्थितीत हा सामनाही फलंदाजांसाठी उत्कृष्ट ठरण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना येथे मेहनत घ्यावी लागणार आहे.
या सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधी आपला संघ जाहीर केला होता. इंग्लिश संघात कोणताही बदल करण्यात आलेला नसून मागील सामन्यात खेळलेले अकरा खेळाडू या सामन्यातही खेळतील.
तिसऱ्या टी-20 साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हनः बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन क्रर्स, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि आदिल रशीद.
संबंधित बातम्या