IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्याआधी भारतासाठी गूड न्यूज, रिंकू सिंगची दुखापतीवर मात
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्याआधी भारतासाठी गूड न्यूज, रिंकू सिंगची दुखापतीवर मात

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्याआधी भारतासाठी गूड न्यूज, रिंकू सिंगची दुखापतीवर मात

Jan 30, 2025 09:52 PM IST

Ind vs Eng 4th T20: भारताच्या स्टार बॅट्समन रिंकू सिंगने पाठीच्या दुखण्यावर मात केली असून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे.

रिंकू सिंगची दुखापतीवर मात
रिंकू सिंगची दुखापतीवर मात (AFP)

Rinku Singh News: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने दुखापतीवर मात केली असून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशाटे यांनी याला दुजोरा दिला आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी पुण्यात खेळला जाणार आहे. पाठीच्या दुखण्यामुळे रिंकू सिंगला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रिंकू सिंगच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकीय पथकाने त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, भारताचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशाटे यांनी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यापूर्वी रिंकू सिंहला तंदुरुस्त घोषित केले. रिंकू सिंग गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात त्याला संधी मिळाली तर, तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताचा मुख्यप्रशिक्षक गौतम गंभीर जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर बनला, तेव्हा त्याने रिंकूला २०२४ च्या आयपीएलमध्ये एकूण ७० चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्याला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही. शिवम दुबेला त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर संघात स्थान मिळाले.

चौथ्या टी-२० सामन्यात तीन बदल होण्याची शक्यता

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला संघातून वगळले जाऊ शकते. याशिवाय लेग स्पिनर रवी बिश्नोईलाही संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. याशिवाय, ध्रुव जुरेल याला देखील प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. या तिघांच्या जागी अर्शदीप सिंग, रिंकू सिंग आणि शिवम दुबेला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमनदीप सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.

इंग्लंडचा संंघ: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्से, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिलिप सॉल्ट, मार्क वूड.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग