IND vs ENG: भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध चांगली फलंदाजी केली. या मालिकेत त्याने ६०० अधिक धावा केल्या आहेत. आता त्याच्याकडे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सुनील गावस्कर यांनी दोन वेळा एका कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारे सुनील गावस्कर एकमेव भारतीय खेळाडू आहेत. सुनील गावस्कर यांचा हा खास विक्रम मोडण्यापासून यशस्वी जैस्वाल १२० धावा दूर आहे.
पाच दशकांहून अधिक काळ लोटला तरी सुनील गावस्कर यांचा विक्रम अबाधित आहे. धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्धचा शेवटच्या कसोटी सामन्यात या विक्रमाची बरोबरी साधण्यापासून १२० धावा दूर आहे. चार कसोटीसामन्यांत त्याने दोन द्विशतकांसह ९३.५७ च्या सरासरीने ६५५ धावा केल्या आहेत.
गावस्कर, विराट कोहली, दिलीप सरदेसाई आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर कसोटी मालिकेत ६०० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज म्हणून त्याला स्थान मिळाले आहे. गावस्कर वगळता अन्य कोणत्याही भारतीयाने दोन मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत.
१९७१ मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत गावस्कर यांना एकदाच अपयश आले होते. बार्बाडोस येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ते १ धावांवर बाद झाले होते. त्याची इतर धावसंख्या ६५, ६७*, ११६, ६४*, ११७*, १२४ आणि २२० अशी होती.
गावस्कर हे १९७० आणि ८० च्या दशकात पारंपरिक बॉम्बे स्कूल ऑफ बॅटिंगचे पोस्टर बॉय होते. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्यात कोहली गावसकर यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यावरून भारताला अलीकडे काय कमी पडत आहे, हे दिसून येते. कोहलीने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांत ६९२ धावा केल्या होत्या.