भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ७ मार्चपासून धर्मशाला खेळला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाने या कसोटीच्यासाठी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त केएल राहुल धर्मशाला कसोटीतही टीम इंडियाचा भाग असणार नाही.
पण रांची कसोटीत नसलेला जसप्रीत बुमराह टीम इंडियात परतला आहे. वॉशिंग्टन सुंदर हा ५व्या कसोटीतही टीम इंडियाचा भाग असणार नाही. वॉशिंग्टन सुंदरला रणजी सामने खेळण्यासाठी रीलीज करण्यात आले आहे. याशिवाय शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये कोणत्याही नवीन खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही.
बीसीसीआयने निवेदनात सांगितले की, “धर्मशाला कसोटीत केएल राहुलचे खेळणे फिटनेसवर अवलंबून होते. अशा परिस्थितीत केएल राहुल तंदुरुस्त न झाल्यामुळे धर्मशाला कसोटीत सहभागी होणार नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक केएल राहुलची काळजी घेत आहे. केएल राहुललाही चांगल्या उपचारांसाठी लंडनला पाठवण्यात आले आहे.
तसेच, “जसप्रीत बुमराहला रांची कसोटीपूर्वी संघातून मुक्त करण्यात आले होते. मात्र जसप्रीत बुमराहचे ५व्या कसोटीसाठी पुनरागमन केले आहे. बुमराह धरमशाला येथे टीम इंडियामध्ये सामील होणार आहे. तर वॉशिंग्टन सुंदरला रणजी सामने खेळण्यासाठी संघातून मुक्त आले आहे. सुंदर हा तामिळनाडूकडून मुंबईविरुद्ध रणजी सामना खेळणार आहे. गरज पडली तरच सुंदर शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील होईल."
धर्मशाला कसोटीसाठी संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
संबंधित बातम्या