India vs England 5th T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज (२ फेब्रुवारी) ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडेवर भिडतील. टीम इंडियाने याआधीच मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने पहिला, दुसरा आणि चौथा टी20 जिंकून मालिका जिंकली.
चौथ्या टी-20 बद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात प्रथम खेळताना भारताने अवघ्या १२ धावांत ३ महत्त्वाचे विकेट गमावले होते. यानंतर ७९ धावांत ५ विकेट पडल्या होत्या. पण यानंतर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावत धावसंख्या १८१ पर्यंत नेली.
प्रत्युत्तरात इंग्लंडने फलंदाजीतही चांगली सुरुवात केली होती. फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पॉवरप्लेमध्येच ६२ धावा केल्या होत्या. मात्र, अखेरीस इंग्लंडला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. अशा स्थितीत आज हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो. मुंबईत दव चा फारसा परिणाम होणार नाही. तरीही, नाणेफेक जिंकणारा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-20 मध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी होण्याची शक्यता अधिक आहे. भारतीय संघ आज आपल्या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या विश्रांती घेऊ शकतात.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि मोहम्मद शमी.
इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- फिल सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बिथेल, जेमी स्मिथ, आदिल रशीद, साकिब महमूद, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.
संबंधित बातम्या